Satara, 10 May : साताऱ्यातील जकातवाडी येथे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते फुले-आंबेडकर साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. लक्ष्मण माने कार्याध्यक्ष असलेल्या भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. या कार्यक्रमास दरवर्षी आवर्जून उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे यावेळी गैरहजर होते. त्यावरून संस्थेचे कार्याध्यक्ष माने यांनी ‘आमचा कॅप्टन आजारी आहे, याची आम्हाला कल्पना आहे,’ असे सांगून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच, मुंढवा येथील भटक्या विमुक्त संघटनेचे नेते शिवलाल जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार, पारधी समाजाचे नेते व कोल्हापुरातील (Kolhapur) भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश काळे यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भटक्या विमुक्ताचे नेते यल्लाप्पा वैदू यांच्या नावे देण्यात येणारा युवा साहित्य पुरस्कार निलंगा येथील डॉ. प्रकाश जाधव यांना माजी खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
माजी खासदार पाटील म्हणाले, बहुजनांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी शाहू, फुले, आंबेडकर यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच आज हजारो मुले शिकली असून नोकऱ्या करीत आहेत. समाजातील तळागळातील लोकांसाठी लक्ष्मण माने काम करीत आहेत. त्यांना शिवलाल जाधव यांच्यासह राज्यातील विविध कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दरवर्षी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती असायची. यंदा प्रकृतीच्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीत, असे लक्ष्मण माने यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देश माने म्हणाले, ‘आमचा कॅप्टन आजारी आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यांची उपस्थिती आम्हाला ऊर्जा देते. त्यांच्या रूपाने समाजाला नेतृत्व मिळाले. निराधारांना आधार मिळाला आहे.’
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी तुमच्या भावना पवारसाहेबांपर्यंत पोहोचविल्या जातील, असे नमूद करत त्याही पुढच्या कार्यक्रमास मार्गस्थ झाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.