Zilla Parishad fund dispute: आमदारांची कामे जिल्हा परिषदेच्या निधीतून का? कोल्हापूर झेडपीत नव्या वादाला फुटले तोंड

Maharashtra Politics News : आमदारांनी सुचविलेली कामे जिल्हा परिषदेच्या निधीतून का करावीत, याची आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
Kolhapur ZP
Kolhapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. समसमान वाटणीची चर्चा असताना सत्ताधाऱ्याकडून साठ-चाळीस (60-40) या तडजोडीच्या सूत्रावर सहमती दर्शवली. या निर्णयामुळे नवे वाद निर्माण होण्याची चिन्हे असताना. आमदारांनी सुचविलेली कामे जिल्हा परिषदेच्या निधीतून का करावीत, याची आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

जिल्हा परिषदेला केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे 76 कोटी रुपयांच्या निधी विकासकामांना मंजूर केला आहे. या निधीचे सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना समान वाटप होईल, अशी अपेक्षा विरोधी सदस्यांना आहे. मात्र, मिळालेल्या निधीतील सत्ताधाऱ्यांना अधिक वाटा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे विरोधकांना हे अन्यायकारक वाटत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विकासकामांवर याचा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

Kolhapur ZP
Satara ZP : ‘सत्तानाट्यातील मागचं काढू नका’ : भाजपने सुनावताच ‘आमचा आवाज दाबू नका’ म्हणत राष्ट्रवादीचा पलटवार...

या निधीच्या वापराबाबत आणखी एक वादग्रस्त मुद्दा पुढे आला आहे. सदस्यांना मिळणाऱ्या निधीतून आमदारांनी सुचविलेली कामे करण्याचा दबाव वाढत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे. आधीच मर्यादित निधी असताना त्यातून आमदारांच्या सूचनांनुसार कामे करावी लागल्यास सदस्यांच्या स्वायत्तेतवर गदा येणार असल्याची भावना सदस्यांमध्ये तीव्र होत आहे.

Kolhapur ZP
Nanded Politics: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मोठा धमाका, ताकदवान नेता 'या' दिवशी हाती घेणार धनुष्यबाण

एकीकडे निधी वाटपाचा तडजोडीचा फॉर्म्युला स्वीकारावा लागला, तर दुसरीकडे आमदारांच्या हस्तक्षेपामुळे सदस्यांची भूमिका दुय्यम ठरत असल्याची भावना वाढत आहे. परिणामी, विकासकामांपेक्षा राजकीय हस्तक्षेपाचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Kolhapur ZP
Nanded Politics: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मोठा धमाका, ताकदवान नेता 'या' दिवशी हाती घेणार धनुष्यबाण

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत येत्या काळात निधी वाटप आणि कामांच्या प्राधान्यक्रमावरून आणखी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील संतुलन राखत पारदर्शक आणि न्याय वाटप होणे गरजेचे असताना सध्याची परिस्थिती मात्र नव्या वादाला खतपाणी घालणारी ठरत आहे.

Kolhapur ZP
Ambadas Danve nomination: शिवसेनेच्या दोन नेत्यांनी मित्रपक्षांना ठेवलं गाफील, ठाकरेंनी मोक्याच्या क्षणी बदलला निर्णय,दानवेंच्या उमेदवारीपूर्वी'मातोश्री'वर मोठ्या घडामोडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com