Shivsean Minister Shambhuraj Desai
Shivsean Minister Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena News : आमची बाजु भक्कम; विधीमंडळ नियमाच्या चौकटीत राहुनच आमची कृती...शंभूराज देसाई

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad Shivsena News : कोणतेही नियमबाह्य काम आम्ही ४० आमदारांनी केलेले नाही. आमची बाजु न्यायालयात Court भक्कम आहे. कायद्याच्या, घटनेच्या, विधीमंडळ नियमाच्या चौकटीत राहुन आम्ही आमची कृती केलेली आहे. त्यामुळे न्यायालयात आमची बाजु कायदेशीरपणे भक्कम आहे, अशी स्पष्टोक्ती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी केली.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडातुन त्यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले आहे. या सत्तेला न्यायलयात आव्हाण देण्यात आले आहे. त्याचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यापार्श्वभुमीवर मंत्री देसाई हे कऱ्हाड (जि.सातारा) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि धनुष्यबाणाची नियमानुसार, घटनेनुसार, निवडणुक आयोगाची मान्यता आमच्याकडे आहे.

त्यामुळे शिवसेना Shivsena ही आमचीच आहे. कोणतेही नियमबाह्य काम आम्ही ४० आमदारांनी केलेले नाही. आमची बाजु न्यायालयात भक्कम आहे. कायद्याच्या, घटनेच्या, विधीमंडळ नियमाच्या चौकटीत राहुन आम्ही आमची कृती केलेली आहे. त्यामुळे न्यायालयात आमची बाजु कायदेशीरपणे भक्कम आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना कर्नाटकात कोणी ओळख नाही, या अजित पवार यांच्या टीकेवर मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath Shinde हे प्रगत राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अडचणीच्यावेळी मदतीला धावुन जाणारा नेता म्हणून शिंदे यांची ख्याती आहे. राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्षे चांगले काम केले आहे. भारतीय जनता पक्षाने विनंती केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे कर्नाटकला प्रचारासाठी गेले होते.

त्यांना मागणी होते, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे कर्नाटकला गेले होते. माजी उपमुख्यंत्री अजित पवार यांना तेथे मागणी नसेल, त्याची खंत त्यांच्या मनात असेल म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्याबद्दल असे वक्तव्य केले असेल. विरोधी पक्षाच्या आमदारांना पालकमंत्री भेटत नाहीत, निधी देत नाहीत या अजित पवार यांच्या वक्तव्यावर मंत्री देसाई म्हणाले, विरोश्री पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्याच राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्र्यांना ते किती वेळा येऊन भेटले हे विचारावे.

अनेक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे आमदार अनेकवेळा येवुन आमच्या मंत्र्यांना मंत्रालयात भेटतात. मंत्रालयातील सीसीटीव्ही फुटेज काढुन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे किती आमदार आम्हाला मंत्रालयात येवुन भेटले हे अजित पवार यांना दाखवु म्हणजे ते असे वक्तव्य करणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT