Satara : पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला.
यावेळी भव्य दिव्य दिंडी काढण्यात आली. या दिंडी दरम्यान राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या पत्नी स्मितादेवी देसाई यांनी फुगडी खेळत विठ्ठल नामाचा ठेका धरला.
यावेळी त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते.
या रिंगण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. मंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला.
दरम्यान, या भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळ्याने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते. या सोहळ्यात मंत्री शंभूराज देसाई व त्यांच्या पत्नी स्मितादेवी देसाई यांनी फुगडी खेळत आनंद घेतला. वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने, कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.
(Ediited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.