Satara Congress News : लोकशाहीला न मानता न जुमानता भाजप एखाद्या मिशनला लोटस मिशन असे नाव देते, हे अयोग्य आहे. आता कर्नाटकमधुन परता असे मिशन तेथील जनतेने राबवले आहे. या निवडणुकीत भाजपला BJP बजरंग बलीही वाचवणार नाही. कर्नाटक मध्ये बजरंग बलींची मंदिरे बांधण्याचा निर्णय काँग्रेस Congress पक्षाने घेतला आहे. मणिपूरमध्ये आगीचा डोंब उसळला असताना भाजपचे देशपातळीवरील आणि राज्यपातळीवरील नेते कर्नाटक निवडणुकीत प्रचारासाठी उतरले आहे, हे देशातील जनतेला पटले नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी भाजपवर केली आहे.
पटोले म्हणाले, मुळात आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधीचे आणि विचारांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. गौरव पाटील यांच्या विचारांना खटा देण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत आहे. गरिबांच्या मुलांना शिक्षणच मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली असून आज जागोजागी पैसेवाल्या लोकांच्या ॲकॅडमी पाहायला मिळत आहे. तिथे फक्त श्रीमंतांचीच मुले शिक्षण घेऊ शकतात.
त्यामुळे महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार पुसण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कर्नाटक निवडणुकीमध्ये सध्या तेथील काही स्थानिक संघटनांनी सहभाग घेतला आहे. या निवडणुकीत बाहेरून प्रचार करण्यासाठी कोणीही येऊ नये. अशी त्यांची मानसिकता असतानाही त्या ठिकाणी प्रचाराला गेल्यामुळे काही जणांना रोषाला बळी पडावे लागले असले तरी काही संघटनांचा रोख मात्र पूर्णपणे भाजप विरोधी आहे.
सत्तेसाठी काय पण अशी कायम भूमिका घेणाऱ्या भाजपने नेहमीच दुटप्पी धोरण घेतले. त्यामुळे कर्नाटक मधील जनतेने आता भाजपने परत जावे असे ऑपरेशन राबवले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, भाजपला आता कर्नाटकात बजरंग बली ही वाचवू शकत नाही. राज्य पातळीवरील मुद्द्यांवर बोलताना ते म्हणाले, आगामी निवडणुकीत भाजप विरोधात जे जे लढण्याचे धारिष्ट दाखवतील काँग्रेस त्यांना बरोबर घेण्याचा विचार करीत आहे. याच महिन्यात जागा वाटपाबाबत शिवसेना राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षांची चर्चा केली जाणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये काही धुसफूस आहे का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, महाविकास आघाडीत नव्हे तर जनतेच्या मनात धुसफूस आहे. गेल्या सात महिन्यात महागाई प्रचंड वाढली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे मुद्दे मांडायचे नाहीत का? मी आरोप करतो असे म्हटले जाते मात्र मी वास्तविकता मांडतो. जनतेचे प्रश्न पुढे आले पाहिजेत. काँग्रेस पक्षाची बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी आहे.
जनतेच्या सोबत जाणे हा आमच्या धोरणाचा एक भाग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर टीका करताना ते म्हणाले, लोकशाहीची व्यवस्था आणि संविधानाचा वापर योग्य हवा असे आमचे मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना मदत देतो असे जाहीर केले होते. ती मदत शेतकऱ्यांना मिळाली का हाही एक प्रश्न आहे. आज महाराष्ट्रामध्ये क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर महिलांची तस्करी केली जात आहे.
चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आज महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मुख्यमंत्री होऊन गेले. या दोन्ही चव्हाणांचा बाणा आता दिसत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. कोकणातील बारसू प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, जनतेचे मत घेऊन त्या ठिकाणी रिफायनरी करावी. कोकणातील वनसंपदा संपवून त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प लादु नये, अशीच सर्वांची भूमिका आहे.
त्या ठिकाणी आंदोलकांसह महिला आंदोलकांवर लाठीचार्ज होतो ही अत्यंत लाजिरवाणी बाब असुन आम्ही कोकणातल्या जनतेबरोबर आहोत असे सांगत त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. पुणे येथील प्रदीप परुळकर यांनी पाकिस्तानला पुरवलेल्या गोपनीय माहितीबाबत बोलताना ते म्हणाले, अशा व्यक्तीवर कारवाई केल्यास त्यास कोणीही विरोध करणार नाही. कोणत्याही धार्मिक संघटना अथवा संस्था या देशहिताच्या असाव्यात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संगममाहुली राजघाटाबाबत पुढाकार घेणार
सातारा शहर परिसरात असणाऱ्या संगममाहुली येथील राजघाटाला आज सकाळी मी भेट दिली. त्या ठिकाणी असणाऱ्या शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या परिसरातील अवस्था अत्यंत बिकट असून ती व्यवस्थित कशी करता येईल, यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लवकरच धोरण आखण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.