Shivajirao Patil, Rajaram Kawade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

P.N. Patil Karweer : भोगावती कारखान्याचे अध्यक्षपद करवीरकडेच; विधानसभेसाठी पी. एन. पाटलांची मोठी खेळी

Bhogwati Sygar Factory : धीरज डोंगळेंचे नाव अचानक मागे पडल्याने कोल्हापुरात चर्चा

Rahul Gadkar

Kolhapur Political News : आगामी विधानसभा निवडणुकीची बेरीज डोळ्यांसमोर ठेवून भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद बी. ए. पाटील किंवा धीरज डोंगळे यांच्याकडे सोपवतील अशी चर्चा होती. मात्र, यापैकी कुणालाही संधी न देता भोगावतीच्या अध्यक्षपदाची माळ तिसऱ्याच्याच गळ्यात पडली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी सांगितले एक आणि दाखवले दुसरेच अशी चर्चा रंगू लागली आहे. भोगावतीच्या अध्यक्षपदावर करवीर विधानसभा मतदारसंघातीलच देवळेतील शिवाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी राधानगरीचे राष्ट्रवादीचे राजाराम शंकर कवडे यांची निवड झाली.

भोगावती कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी दुपारी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या वेळी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा निर्णय झाला. त्यानंतर बंद लखोटा उघडून हे नाव जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे होते. नाव जाहीर होताच अनेकांनी वर्तवलेल्या अंदाजाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

भोगावतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 25 पैकी 24 जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. त्यामुळे साहजिकच या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीबाबत आमदार पाटील यांनी स्वतः निर्णय घेतला, तर उपाध्यक्ष कवडे यांचे नाव ए. वाय. पाटील यांच्याकडून पुढे आले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भोगावती कारखान्याचे अध्यक्षपद करवीरमध्येच ठेवले आहे. यानुसार शिवाजीराव पाटील यांचा ऐनवेळी विचार झाला, तर राधानगरीतील आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवण्यासाठी ए. वाय. पाटील यांनी कवडे यांना संधी दिल्याचे स्पष्ट होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, गुरुवारपर्यंत भोगावती कारखान्याला कर्जातून वाचवण्यासाठी धीरज डोंगळे यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी पसंत होती. शिवाय पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते बी. ए. पाटील यांचीही चर्चा होती. मात्र, शुक्रवारी दुपारी संचालक मंडळांनी बैठक घेत शिवाजीराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. कालपर्यंत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी डोंगळे आणि पाटील यांच्या नावाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी शिवाजीराव पाटलांच्या नावाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT