Dr. Apurv Hire News : पालकमंत्री दादा भुसे यांचे राजकीय विरोधक आणि शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांत सातत्याने पोलिसांत गुन्हे दाखल झालेले आहेत. ही मालिकाच सुरू आहे. हा प्रकार राजकीय द्वेषातून होत असून, त्यातील तक्रारींत काहीही तथ्य नसल्याचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी म्हटले आहे. (There was not a single FIR had a factual, we will get Justice)
शिवसेनेचे (Shivsena) उपनेते अद्वय हिरे यांना एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी (Police) अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल झाल्याने तो राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.
यासंदर्भात माजी आमदार हिरे म्हणाले, गुरुवारी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता संस्थेच्या ज्या-ज्या शाखांमध्ये अटल लॅबसाठी अनुदान प्राप्त झाले आहे, त्या ठिकाणी लॅब अस्तित्वात असून, योग्य प्रकारे सुरू आहेत. यात कुठलाही घोटाळा झालेला नाही. मात्र, नाशिक शहरातील काही पोलिस ठाण्यात अन्य काही तक्रारी दाखल आहेत. या तक्रारी कोणत्या हेतूने व कोणाच्या अदृष्य प्रयत्नांनी झाल्या असतील, हे सांगण्याची गरज नाही. जनतेला सर्व समजते आहे.
ते म्हणाले, केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून कुठलीही तक्रार आलेली नाही. सदरचे आरोप व गुन्हे हे फक्त राजकीय आकस ठेवतच नोंदविले गेले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सदरचे अनुदान हे केंद्र सरकारकडून येत असल्याकारणाने यात गुन्हा नोंदविण्याचा अधिकार राज्य शासनाला किंवा शिक्षण विभागाला नसल्याने अवैधरीत्या हा गुन्हा नोंदविला गेला आहे. याच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे समन्वयक असलेल्या डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांच्यासह अद्वय हिरे यांच्या विरोधात शिक्षक भरतीसह नोकरीचे आमिष दाखवून नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत चार गुन्हे दाखल असलेल्या हिरे कुटुंबीयांविरोधात पाचवा गुन्हा भद्रकाली पोलिसांत दाखल झाला आहे. हिरे यांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून निती आयोगाकडील एक कोटी ५६ लाख रुपयांचा निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, नाशिक रोड पोलिसांत दाखल शिक्षक भरती प्रकरणी गुन्ह्यात संस्थेचे संचालक व सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले डॉ. अद्वय हिरे यांच्यासह तिघांना नाशिक रोड न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र शिवसेना नेते अद्वय हिरे हे पालकमंत्री भुसे यांचे राजकीय विरोधक असल्याने या सर्व खटल्यांमध्ये राजकीय वास येऊ लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.