Gopichand Padlkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Drought Fund Corruption : दुष्काळनिधी घोटाळ्याप्रकरणी पडळकर आक्रमक; ‘सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा’

Gopichand Padlkar Demand : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या दुष्काळ निधीतील गैरव्यहार प्रकरणी सहा शाखेतील आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता सांगली जिल्ह्यातील 219 शाखांमध्ये दुष्काळ निधीतील घोटाळ्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळी निधीच्या अपहाराची रक्कमही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Vijaykumar Dudhale

Sangli, 26 May : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत दुष्काळी मदतनिधीच्या रक्कमेत तब्बल अडीच कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बॅंकेवर प्रशासक नेमण्याची मागणी पडळकर यांनी सरकारकडे केली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत (Sangli District Bank) जमा झालेल्या दुष्काळ निधीतील गैरव्यहार प्रकरणी सहा शाखेतील आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता सांगली जिल्ह्यातील 219 शाखांमध्ये दुष्काळ निधीतील घोटाळ्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळी निधीच्या अपहाराची रक्कमही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घोटाळ्याची व्याप्ती 25 ते 30 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या प्रकरणी सहकार विभागाकडून चाचणी लेखा परीक्षण करण्याची मागणी होत आहे. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात येत आहे. यापूर्वीही नोकर भरतीच्या नावाखालीही सांगली जिल्हा बॅंकेत गैरव्यवहार झाला होता. तसेच, कर्ज वितरण आणि थकबाकी प्रकरणीही बॅंक अडचणीत सापडली होती. त्या वेळी बॅंकेच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती.

सांगली जिल्हा बॅंकेत वारंवार होणाऱ्या घोटाळ्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) हे आक्रमक झाले आहेत. सांगली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी पडळकर यांनी केली आहे.

बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या नोकर भरती आणि इतर घोटाळ्यानंतर शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घोटाळ्याचे मालिका सुरू आहे. दुष्काळ निधीमध्येही आता घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. आता बँकेच्या 219 शाखांची तपासणी म्हणजे घोटाळा करणाऱ्या मंडळींकडूनच घोटाळ्याच्या चौकशीचा प्रकार आहे, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

घोटाळ्यांच्या सदोष आणि सखोल चौकशीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी होत आहे. बँकेतील नोकरभरती घोटाळा प्रकरणीही विधान परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनंतर तत्कालीन सहकार मंत्र्यांनी बँकेचे चौकशीसाठी समिती नेमली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT