NCP Political News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nilesh Lankhe News : 'राष्ट्रवादी फुटीच्या धक्क्यातून अजूनही सावरलो नाही'; आमदार लंकेंनी दिली कबुली!

NCP Political News : आता माझी जबाबदारी वाढली आहे, नीलेश लंके..

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार नीलेश लंके यांनी सध्याच्या राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या धक्क्यातून अजूनही मी बाहेर पडलेलो नाही, असे म्हटले आहे. आमदार लंके यांच्या या भावनिक विधानामागे त्यांचे पुढचे राजकीय गणिते दडलेले असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत. (Latest Marathi News)

स्वातंत्र्यसेनानी, माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दी महोत्सव समिती, स्नेहालय, रावसाहेब पटवर्धन स्मारक, राजमुद्रा अकादमी, मेजर दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ, पेमराज सारडा महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग, स्वयंसेवी संस्थांचा महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात आमदार लंके यांना प्रा. मधू दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र, संविधानाची प्रस्तावना आणि सकस वैचारिक पुस्तकांचा संच, असे पुरस्कारेच स्वरुप होते.

आमदार नीलेश लंके यावेळी म्हणाले, "प्रा. दंडवते यांनी विचारांशी कधीच तडजोड केली नाही. पंतप्रधानपदाची खुर्ची खुणावत असतानाही दंडवते यांनी आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. हल्ली राजकारणात सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, तर संध्याकाळी तिसऱ्या पक्षात, अशी अवस्था झाली आहे. मलाही कळत नाही. दंडवते यांच्या नावाने मला आदर्श लोकप्रतिधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. या पुरस्काराचे श्रेय मतदारसंघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना, दीन दुबळे, दिव्यांगांना आहे. माझ्या प्रत्येक कामात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो, असे आमदार लंके यांनी म्हटले.

मधू दंडवते यांचे चिरंजीव उदय दंडवते, साधाना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, विजया चौहान, स्नेहालयच्या अध्यक्षा जया जोगदंड, श्याम असावा, हेरंब कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, माजी आमदार दादा कळमकर, शिवाजी नाईकवाडी, माजी महापौर अभिषेक कळमकर, अ‍ॅड. राहुल झावरे, अर्जुन भालेकर, सरपंच राजेंद्र शिंदे उपस्थित होते.

दंडवतेंचा साधेपणा भावतो -

आमदार नीलेश लंके यांनी मधु दंडवते यांचा साधेपणा भावतो, असे म्हणते त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मधु दंडवते यांनी आपल्या कामातून देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. दंडवते यांच्या विचारांची आजच्या राजकारणात, समाजकारणात खऱ्या अर्थाने गरज आहे. आजच्या राजकारणाची वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे आपण पाहतो. आजच्या राजकाण्यांनी दंडवते यांचे विचार आचारणात आणणे गरजेचे आहे. दंडवते मंत्री असतानाही रिक्षाने प्रवास करीत इतका साधेपणा त्यांनी आपल्या जीवनात जपल्याची आठवण आमदार लंके यांनी सांगितली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT