Nagpur Winter Session 2023 : अंबादास दानवेंची 'गुगली'...नीलेश लंके 'क्लीन बोल्ड'

Maharashtra Assembly Winter Session 2023: सत्ताधारी मराठा आमदार विधानसभा परिसरात फलक घेऊन उभे होते.
Ambadas Danve,Nilesh Lanke
Ambadas Danve,Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस (काल) विधानसभेच्या आवारातील राजकीय नेत्यांनी एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्यांनी गाजला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या एका कोपरखळीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांनादेखील समोरे जावे लागले. अंबादास दानवे यांनी याचा व्हिडिओ त्यांच्या समाज माध्यम खात्यावर पोस्ट केला असून, तो सध्या व्हायरल होत आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला काल (गुरुवारी) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानसभा परिसर आंदोलनानी गाजवला. सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शने केली. विरोधक सत्ताधारी भाजप महायुतीतील आमदारांना कोपरखळ्या मारण्याची संधी सोडत नव्हते. सत्ताधारी आमदारदेखील विरोधकांना घेरत होते. यातून धीर-गंभीर विनोदी प्रसंग घडत होते.

या अधिवेशनावर मराठा-ओबीसी आरक्षणाचे सावट आहे. मराठाबरोबरच धनगर, मुस्लिम यांचादेखील आरक्षणासाठी संघर्ष आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या संघर्षाला मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे करून धार आणली आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी मराठा आमदार विधानसभा परिसरात फलक घेऊन उभे होते. या आंदोलनाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील पाठिंबा दिला.

Ambadas Danve,Nilesh Lanke
Nagpur Winter Session 2024 : कार्यालय नसलं तर पायऱ्यांवर बसू; पण जनतेचे प्रश्न मांडू...

सरकारमधील आमदारांना आंदोलन करावे लागत आहे, याकडे पत्रकारांनी अंबादास दानवे यांचे लक्ष वेधले. सरकारमधील आमदारांबरोबर तुम्ही कसे, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मी मराठा म्हणून येथे आलो आहे. मराठा आरक्षण हा सरकार किंवा बिन सरकार असा विषय नाही. सरकारमधील आमदारांना आंदोलन करावे लागते आहे, असा प्रश्न विचारल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्या शेजारी उपस्थित असलेले नीलेश लंके यांचा हात पकडत त्यांनाच विचारा, असा प्रतिप्रश्न केला. यावर तिथे एकच हशा पिकला आणि आमदार नीलेश लंके यांनी तेथून निघण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दानवे यांनी त्यांचा हात ओढला. दानवे यांच्या या कोपरखळीवर आमदार लंके यांच्याबरोबर तिथे असलेले सत्ताधारी आमदार 'क्लीन बोल्ड' झाले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com