Bhanang Election
Bhanang Election sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पक्ष ठेवले बाजूला; भणंग गावाने दिली अपक्षांच्या हाती सत्ता

सरकारनामा ब्युरो

मेढा : भणंग (ता. जावळी) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत सर्व अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. सर्व सातही जागा अपक्ष उमेदवारांनी मताधिक्याने जिंकल्या आहेत. सर्व अपक्ष उमेदवार निवडून आल्यामुळे हा निकाल संपूर्ण राज्याला अश्चर्यचकित करणारा ठरला आहे. जनतेतून सरपंच म्हणून गणेश साईबाबा जगताप हे विजयी झाले आहेत.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील भणंग या एकाच ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पहिल्या टप्प्यात जाहिर झाला होता. दरम्यान या निवडणुकीसाठी रविवार (ता. १६) रोजी मतदान झाले. यावेळी मतदारांनी उत्स्फूर्तपणे ८२ टक्के मतदान केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या श्री. पाडळेश्वर ग्रामविकास पॅनेल व इतर सर्व अपक्ष उमेदवारांत ही निवडणूक रंगली होती.

एकच पॅनेल व इतर सर्व उमेदवार अपक्ष उभे राहिल्यामुळे या निवडणुकीची चर्चा सर्वत्रच होती. त्यातच या अधिकृत पॅनेलचा पराभव करीत सर्व अपक्ष निवडून आल्यामुळे भणंग गावासाठी हा निकाल धक्कादायक ठरला. संपूर्ण राज्याला या निकालाने आश्चर्यचकित केले आहे. जनतेतून थेट सरपंच निवडीत गणेश साईबाबा जगताप हे सुद्धा अपक्ष उमेदवारच विजयी झाले आहेत.

निवडून आलेल्या उमेदवारांवर इतर पक्ष आपला हक्क सांगत असून अपक्ष उमेदवार कोणाला पसंती देणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. अपक्ष उमेदवारांच्या विजयात धनराज जगताप, मोहन जगताप, जितेंद्र जगताप, रामदास जाधव, अंकुश जाधव, दत्ता जाधव, रामदास भोसले, बबनराव गाडे, जनार्दन गाडे, आनंद जाधव, सुरेश निकम, कृष्णा जाधव, शामराव भोसले यांचा मोलाचा वाटा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT