abhijeet pawar and grampnchyat membar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Pandharpur: पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे पक्ष विस्ताराचे आव्हान; अभिजीत पाटलांचा लागणार कस

Party expansion challenge to NCP in Pandharpur Constituency : येत्या काळात अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

Sachin Waghmare

हुकूम मुलाणी

Nationalist congress Party : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वच पक्षाकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केली जात आहेत. तालुक्यामधील 27 ग्रामपंचायतीच्या निकालानंतर तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी केलेले दावे व झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहिल्या तर काहीच ताळमेळ लागत नाही. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील प्रमुख प्रश्नाकडे सत्ता असताना केलेल्या दुर्लक्षामुळे पक्षाचा विस्तार वाढवणे आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या माध्यमातून अभिजीत पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादीचा विस्तार वाढवण्याचा श्रीगणेशा केला आहे.

भाळवणीतील चार ग्रामपंचायत सदस्यांचा प्रवेश

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये भाळवणीतील चार ग्रामपंचायत सदस्यासह पंडित माने, महादेव शिंदे, रावसाहेब बिरूनके, दामाजी माने, ज्ञानेश्वर शिंदे,भागवत वाडेकर, सत्यवान जावीर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभेरी, आबा माळी, तालुका कार्याध्यक्ष माणिक गुंगे, उपाध्यक्ष संतोष रंदवे, माऊली कोंडूभैरी, जमीर इनामदार, स्मिता अवघडे, संजय खरात, विठ्ठलचे सचिन वाघाटे, यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये मुज्जमील काझी, धनाजी चव्हाण, आणि काशिनाथ सावंजी यांनी भूमिका बजावली.

राष्ट्रवादीला पहिल्या क्रमांकावर आणावे लागणार

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीला जवळपास दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीचे संभाव्य दावेदार मानले जात आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मंगळवेढा तालुक्यातील मतदार सर्वाधिक आहे.परंतु सद्य:स्थितीला राष्ट्रवादी जवळपास चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी अभिजीत पाटील यांना या पुढील काळात मोठे कष्ट करावे लागणार आहे.

दुष्काळ, चारा छावण्या सुरू करण्यासाठी पुढाकार

अभिजीत पाटील यांनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली असून, स्वतः तालुक्यातील दुष्काळ जाहीर करणे, चारा छावण्या सुरू करणे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिले. या मागणीला म्हणावे तितके यश आले नसले तरी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरू लागले आहेत. अशा परिस्थितीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने भविष्यात त्यांना प्रयत्न करावे लागणार असले तरी भाळवणीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश हा त्यांच्या दृष्टीने आशेचा किरण ठरणारा आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT