Sharad Pawar, Prabhakar Gharge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : बालेकिल्ल्यात पवारांचे बेरजेचे राजकारण...

Umesh Bambare-Patil

Satara political news : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी सातारा बालेकिल्ल्यात पक्षाची झालेली पडझड लक्षात घेऊन बेरजेचे राजकारण सुरू केले आहे.  या पार्श्वभूमीवर आज पवार खटाव तालुक्याचे नेते व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

या माध्यमातून आगामी काळात घार्गे यांना पक्षात घेऊन खटाव तालुक्यात पक्ष भक्कम करण्याचे त्यांचे मनसुभे दिसत आहेत. सातारा जिल्ह्यात भाजप बरोबरच अजित पवार गटाला रोखण्याची पवार यांची रणनीती दिसत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर सातारा जिल्ह्यात पक्षात उभी फूट पडली. खासदार शरद पवार Sharad Pawar गटाची जिल्ह्यात ताकद कमी झाली आहे.

फलटण, वाई, माण, खटाव, पाटण, कोरेगावमध्ये पक्षाची ताकत विभागली आहे, याचा फायदा शिंदे गट शिवसेना किंवा भाजपला होण्याचा धोका आहे. त्यामुळे सातारा बालेकिल्ल्यात पक्षाची ताकत वाढविण्यासाठी पवार यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. खटावचे नेते प्रभाकर घार्गे Prabhakar Gharge यांनी मध्यंतरी काही कारणांनी राष्ट्रवादीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर ते भाजपशी जवळीक साधून होते, पण त्यांनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही. आगामी काळात त्यांना सातारा लोकसभेसाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी कोणत्या पक्षात जायचे याचा ते विचार करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी खासदार शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याबाबत प्रयत्न सुरू केला आहेत. त्यांच्या याबाबत दोन-चार बैठकाही झाल्या असल्याचे सांगितले जात आहे.

पण त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आज घार्गे यांच्या मुलीचे लग्न सातारा तालुक्यातील अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील भव्य मंगल कार्यालयात होत आहे. या लग्न समारंभास राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार आज आवर्जून उपस्थित राहत आहेत. त्यामुळे या लग्नकार्याच्या निमित्ताने ते घार्गे यांच्याशी जवळीक साधून ते आगामी काळात त्यांना पक्षात घेऊन बेरजेचे राजकारण करण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच त्यांच्या माध्यमातून खटाव तालुक्यात व सातारा लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाची ताकद वाढवणार आहेत. कदाचित सातारा लोकसभेसाठी ही त्यांचा  विचार पवार करू शकतात. त्यामुळे पवार यांचा आजचा सातारा दौरा महत्त्वपूर्ण  मनाला जात आहे.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT