Sharad Pawar : शरद पवारांनी अजितदादांचे आरोप चोवीस तासांत खोडले

NCP Crisis : अजित पवारांच्या शिवसेनेसोबत गेलेले चालते मग भाजप का नाही, या आरोपावर शरद पवार म्हणाले...
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन करण्याची सूचना शरद पवारांनी दिली होती, असा आरोपही अजित पवारांनी शुक्रवारी केला होता. त्यावर शरद पवार यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करत त्यांचे आरोप खोडून काढले. राजीनाम्याचा निर्णय सामूहिक होता, असे पवारांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्जत येथील पदाधिकारी बैठकीत अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर बोलताना पवार म्हणाले, काही गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या. सतत्या काय आहे हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या बोलण्यात सत्यता नाही. मी राजीनामा देण्याची गरज काय, मी पक्षाचा अध्यक्ष होतो. राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय झाला होता. राजीनामा दिल्यानंतर कुणाला आंदोलन करा, असे सांगण्याची गरज काय? राजीनामा देण्याचा निर्णय घेण्याची माझी कुवत आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड; काळे फासण्याचा डाव ?

माझी भूमिका स्वच्छ होती. भाजपबरोबर जायला नको. तेसुद्धा या मताचे होते, असे सांगताना पवार म्हणाले, माझ्याकडून कधीही त्यांना बोलावणे नव्हते. पक्षाचा मी अध्यक्ष असल्याने कोणत्याही नेत्यांना माझ्याशी सुसंवाद करण्याचा त्यांचा अधिकार होता. ज्या मागण्या केल्या असतील त्यावर चर्चा झाली, पण ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते, तो विचार आम्हा लोकांना सुसंगत नव्हता. निवडणुकीत आम्ही लोकांना जी मते मागितली ती भाजपमध्ये जाण्यासाठी नव्हती. एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. जे आमचे लोक निवडून आले, त्यांना लोकांचा मतांचा पाठिंबा होता. त्याच्यापेक्षा विपरीत काम आता करावे, असे कुणी सुचवत असेल तर ती लोकांशी फसवणूक असून ते योग्य नाही, अशी भूमिका माझ्यासह इतर सहकाऱ्यांची होती, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेसोबत गेलेले चालते मग भाजप का नाही, असा मुद्दाही अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना शरद पवार यांनी शिवसेनेबाबतची भूमिका वेगळी होती, असे सांगितले. आजही आमची भूमिका भाजपविरोधी आहे. ती शिवसेनेविरोधी नाही. शिवसेनेशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र बसून कार्यक्रम ठरविला होता. आज ते बाहेर पडले तेही मंत्रिपदावर होते, असा टोला पवारांनी लगावला.

(Edited By - Rajanand More)

Sharad Pawar, Ajit Pawar
Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'इंडिया' आघाडीला धक्का देण्याची सरकारची तयारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com