Abhijit Patil
Abhijit Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटलांनी केली दोन महिन्यातच वचनपूर्ती

भारत नागणे : सरकारनामा ब्युरो

पंढरपूर : मागील दोन वर्षापासून थकीत असलेले शेतकऱ्यांचे (Farmer) सुमारे 30 कोटी रुपयांचे ऊस बिल सभासदांना वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी दिली. विठ्ठलचे अध्यक्षपद स्विकारल्यापासूनच अवघ्या दोन महिन्यातच शेतकर्यांना दिलेले थकीत ऊस बिलाचे वचन त्यांनी पूर्ण केले आहे.

नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत थकीत ऊस बिलाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. निवडणुक प्रचारा दरम्यान, पाटील यांनी गळीत हंगामाची मोळी टाकण्यापूर्वी सभासदांचे थकीत पैसे देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणुकीत सभासदांनी अभिजीत पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदी पाटील यांची निवड झाली. निवडिनंतर थकीत ऊस बिल कधी मिळणार याकडेच शेतकर्यांचे लक्ष लागले होते. मध्यंतरी अभिजीत पाटील यांच्या खासगी साखर कारखाने आणि कार्यालयावर आयकर विभागाने तापसणीची कारवाई केली होती. त्यामुळे थकीत ऊस कधी मिळणार याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, आज कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी गाळप हंगाम 2020-21 मध्ये गाळपास आलेल्या सुमारे 4 हजार ऊस उत्पादक शेतकर्यांचे सुमारे 30 कोटी रुपयांची थकीत ऊस बिलाचे वाटप सुरु केल्याची माहिती आज दिली. कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके व त्यांच्या संचालक मंडळाला दोन वर्षात जे जमले नाही ते अभिजीत पाटील यांनी अवघ्या दोन महिन्यात करुन दाखवल्याने सभासदांमधून त्यांचे कौतुक केले जात आहे.

कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले की, दोन वर्षापासून बंद असलेला कारखाना यावर्षी सुरु होणार आहे. कारखान्यासाठी लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कारखान्यातील दुरुस्तीची कामे युध्द पातळीवर सुरु आहे. येत्या काही दिवसात बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रम घेवून कारखान्याचे धुराडे पेटवले जाणार आहेत. कारखान्याना निवडणुकीत सभासदांना जी अश्वासने दिली आहेत. त्या सर्व आश्वासनांची वचनपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कारखाना सुरु करण्यापूर्वी शेतकर्यांचे पैसे देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ऊस बिलाचे वाटप सुरु केले आहे. येत्या गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती टन दोन हजार 500 रुपये भाव देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांना दर दिला जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले आहे. या वेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रेमलता रोंगे यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT