पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार

राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे महत्वाचे काम या समितीच्या माध्यातून करण्यात येते.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याच्या पद्म पुरस्कार शिफारस समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sudhir Mungantiwar
नाना पाटेकरांच्या घरी मुख्यमंत्री शिंदे रमले तब्बल दीड तास; जेवण अन् रंगली गप्पांची मैफिल

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण असे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. हे पुरस्कार देण्यासाठी योग्य व्यक्ती निवडण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारशी केंद्रीय समितीकडे पाठवल्या जातात. राज्याच्या या समितीवर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis reaction on baramati : भाजपच्या मिशन बारामतीवर फडणवीस म्हणाले...

समितीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, उद्योग उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म दादा भुसे यांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या (राजशिष्टाचार) प्रधान सचिवांचा या समितीत समावेश आहे.

राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे महत्वाचे काम या समितीच्या माध्यातून करण्यात येते. शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच बंदरे व खनिकर्म विभागाचे मंत्री दादा भुसे यांचा समावेश करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com