Ajit Pawar, Ramraje Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan Assembly Election : अजित पवारांचा रामराजेंना इशारा; म्हणाले, "तुमच्यात हिंमत आणि धमक असेल तर..."

Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar : माजी मंत्री व आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे मागील काही दिवसांपासून महायुतीच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारापासून लांब आहेत. ते कुठेही प्रचारात सक्रिय नाहीत याबाबतची तक्रार अजित पवार यांच्याकडे अनेकांनी केली होती.

Jagdish Patil

Phaltan Assembly Election 2024 : माजी मंत्री व आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे मागील काही दिवसांपासून महायुतीच्या आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारापासून लांब आहेत.

ते कुठेही प्रचारात सक्रिय नाहीत याबाबतची तक्रार अजित पवार यांच्याकडे अनेकांनी केली होती. शिवाय एका पत्रकार परिषदेत याबाबतचा प्रश्न देखील अजितदादांना विचारला होता तेंव्हा मी रामराजेंना नोटीस पाठवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

अशातच आता थेट फलटणमध्ये येऊन अजित पवारांनी रामराजेंना (Ramraje Naik Nimbalkar) इशारा दिला आहे. "श्रीमंत राजे तुम्ही उघड उघड त्या दिपक चव्हाणच्या प्रचाराला जावा मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसं राहता ते बघतो." अशा शब्दात अजित पवारांनी इशारा दिला आहे.

दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे फलटण विधानसभा मतदारसंघाचे (Phaltan Assembly Constituency) उमेदवार आहेत. फलटण येथील प्रचारसभेत अजित पवार बोलताना त्यांनी रामराजेंना थेट आमदारकी सोडून शरद पवार गटात जा असं देखील म्हटलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "श्रीमंत राजे दरवाजे लावून चर्चा करत आहात हे आपणला शोभत नाही. आपण श्रीमंत आहात, राजे आहात वरिष्ठ काय म्हणतील. तुमच्यात धमक आणि ताकद असेल तर आमदारकीला लाथ मारून तिकडे जावा मला काही वाटणार नाही.

पण आमदारकी पण टीकवायची आणि आणि वेगळा प्रचार करायचा हे काही बरोबर नाही." असं म्हणत अजित पवारांनी रामराजे यांना इशारा देत आपली नारजी देखील उघड बोलून दाखवली. त्यामुळे आता रामराजे निंबाळकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT