Satej Patil : महाडिकांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, सतेज पाटलांनी थेट त्यांचा जिल्हाच काढला

Kolhapur Politics, Assembly Election 2024 : "महाडिकांचं वक्तव्य म्हणजे माता भगिनींचा अपमान केल्याचा प्रकार आहे. महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्यामुळेच असली वक्तव्य येत आहेत. अखेर खरं सत्य जनतेसमोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीला दणका बसल्यानेच लाडक्या बहिणीला केलेला वादा आहे."
Satej Patil, Dhananjay Mahadik
Satej Patil, Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 10 Nov : "काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत जी बहीण दिसेल, त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो." असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

मात्र, आपलं वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हतं. तरीही माझ्या वक्तव्याने माता भगिनींचं मन दुखावलं असेल तर त्यांची बिनशर्त माफी मागतो, असं म्हणत महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाय ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे (Ladaki Bahin Yojana) लाभ मिळाला नसेल, त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण हे वक्तव्य केल्याची सारवासारव त्यांनी केली आहे.

मात्र, त्यांच्या याच वक्तव्यावरून आता काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी महाडिकांवर हल्लाबोल केला आहे. महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्यामुळेच असली वक्तव्य ते करतात, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, "असं वक्तव्य म्हणजे माता भगिनींचा अपमान केल्याचा प्रकार आहे. महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्यामुळेच असली वक्तव्य येत आहेत.

Satej Patil, Dhananjay Mahadik
Jayant patil : जयंत पाटलांनी सांगितली भाजपच्या महाराष्ट्र धर्माची व्याख्या, देवेंद्र फडणवीसांना दिले उत्तर

अखेर खरं सत्य जनतेसमोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीला दणका बसल्यानेच लाडक्या बहिणीला केलेला वादा आहे. महिलांवर उपकार केल्याची भावना ही भाजपची आहे. घरातले पैसे दिल्याची भावना आहे. पोटनिवडणुकीत धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) जयश्री जाधवांचा अपमान केला होता. आता देखील त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. महाडिक हे या मातीतले नाहीत. ते पर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळेच या मातीचा गुण त्यांना कळालेला नाही", अशी बोचरी टीका सतेज पाटलांनी केली आहे.

महाडिक नेमकं काय म्हणाले?

एका सभेत बोलताना लाडक्या बहिण योजने संदर्भात बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, "एखाद्या ठिकाणी काँग्रेसची (Congress) रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला 1500 रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही. अनेक ताई आहेत ज्या सांगताहेत आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय?"

Satej Patil, Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik on Satej Patil : धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा; म्हणाले..'डोनेशन अन् भ्रष्टाचाराच्या पैशाची..'

चौफेर टीका होताच माफीनामा

महाडिकांच्या व्यक्तव्यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली आहे. "माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची बिनशर्त माफी मागतो. माझे वक्तव्य माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हतं. लाडकी बहीण योजने संदर्भातील माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.

ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांचे फोटो काढून पाठवा त्यांचे व्यवस्था आपण करू असं मी म्हणालो. कदाचित अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळाले नसतील. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी हे वक्तव्य केलं होतं"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com