Phaltan Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली असून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदने याने आपल्यावर चारवेळा बल्ताकार केल्याचे त्यात म्हटले आहे.तसेच प्रशांत बनकर याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे.याप्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे.आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी (ता.27) फलटणला भेट देत तरुणी डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सातारा पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तरुणी डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय काय घडलं आणि पोलिसांच्या तपासाबाबत माहिती दिली.
चाकणकर म्हणाल्या, तरुणी डॉक्टर ज्या घरात भाड्यानं राहत होती,त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रशांतच्या नावाचा उल्लेख महिला डॉक्टरने तळहातावर केला होता. यावेळी चाकणकर यांनी बनकर यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या असलेली फलटण येथील तरुणी डॉक्टर हॉटेलमध्ये कशा काय गेल्या? याबाबत माहिती देताना मोठा गौप्यस्फोट केला.
रुपाली चाकणकर यांनी यावेळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरुणी डॉक्टर बनकर यांच्या घरी होती. फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आल्याचं सांगितलं. तसेच प्रशांतशी भांडण झाल्यानंतर ती तरुणी एका मंदिराच्या ठिकाणी गेली होती.
त्यावेळी प्रशांत बनकरचे वडील हे तरुणीच्या पाठीमागं तात्काळ मंदिरात गेले. त्यांनी तिची सणासुदीच्या दिवशी असं बाहेर राहणं योग्य नसल्याची समजूत घातली. यानंतर ही तरुणी त्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी निघून गेली. त्या रात्री तिने रात्रभर प्रशांत बनकरला मेसेज केले.मात्र त्याचा फोन बंद होता. त्यादरम्यान करण्यात आलेल्या मेसेजमध्ये तरुणी डॉक्टरनं आत्महत्या करण्याची धमकीही दिल्याचा धक्कादायक दावा चाकणकरांनी यावेळी केला.
दरम्यान, फलटण प्रकरणातील तरुणी डॉक्टर आणि पोलिसांनी यापूर्वी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केल्याचेही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लक्षात आणून दिले. पहिली तक्रार डॉक्टरांकडून करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या.
रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पीएसआय गोपाल बदनेबाबतही हादरवणारा दावा केला आहे.बदने आणि डॉक्टर तरुणीध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान फोनवरून संभाषण झाला होता.पण मार्चनंतर त्यांच्यात कोणताही संवाद झाला नव्हता,अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
तरुणी डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी समोर येतील, असंही चाकणकर यांनी म्हटलं. तसेच प्रशांत बनकर,महिला डॉक्टर यांच्या फोनची तपासणी केली जात आहे. सीडीआरच्या माध्यमातूनही बऱ्याच गोष्टी समोर येतील,असा खळबळजनक दावाही चाकणकर यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.