Pune Jain Boarding: 'जैन बोर्डिंग'च्या लढ्याला मोठं यश, बिल्डर गोखलेंची अखेर अधिकृत घोषणा; धंगेकर मोहोळांना जिलेबी भरवणार...

Dhangekar Mohol controversy : गोखले डेव्हलपर्सच्यावतीनं विशाल गोखले यांनी मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या जागेच्या व्यवहारासंबंधी महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. अखेर गोखले डेव्हलपर्सच्यावतीनं सोमवारी (ता.27) अधिकृतपणे एक मोठी घोषणा केली आहे.
Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Controversy
Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Controversy Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुणे शहरातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भातील वादावर पडदा पडला आहे.जैन बांधव आणि शिवसेना नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्यानं महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये यामुळे राजकीय वैर पेटलं होतं.

धंगेकरांनी हे प्रकरण उचलून धरतानाच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित वातावरण चांगलंच तापवलं होतं. पण मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांत राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर गोखले डेव्हलपर्सच्यावतीनं सोमवारी (ता.27) अधिकृतपणे एक मोठी घोषणा केली आहे.

पुणे शहरातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भावरुनचा वाद काही दिवसांपासून पेटला आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणानंतर जैन समुदाय संतप्त झाला आहे. दरम्यान, जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांच्यासोबत विशाल गोखले यांनी जमिनीचा व्यवहार रद्द केला आहे. याबाबतचा ई-मेल त्यांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टींना पाठवला होता. आता याबाबत बिल्डर गोखले डेव्हलपर्सच्यावतीनं अधिकृतपणे एक भूमिका स्पष्ट केली आहे.

गोखले डेव्हलपर्सच्यावतीनं विशाल गोखले यांनी मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या जागेच्या व्यवहारासंबंधी महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी जैन धर्मियांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती गोखले डेव्हलपर्सच्यावतीने दिली आहे.

Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Controversy
NCP Nagpur Office Lavani Dance : राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी डान्स ; अजितदादांनी अखेर 'अ‍ॅक्शन' घेतलीच,पहिला दणका अध्यक्षांना

मॉडेल कॉलनी येथील जैन मंदिर हे आमच्यासाठी देखील पूजनीय आहे व जैन बांधवांच्या संबंधित मंदिराविषयी असलेल्या भावनांचा आम्हाला आदर आहे. त्यामुळे,सदर मंदीर व वसतिगृहाची इमारत याविषयी जैन धर्मियांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं विशाल गोखले यांनी म्हटलं आहे.

माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना दोन दिवसांत जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असल्याचं म्हटलं. आता त्यांनी पुढील दोन दिवस मोहोळ यांच्याविषयी काहीही बोलणार नसल्याचं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसांत तोडगा निघेल, असं म्हटल्यामुळे आपण आनंदी आहोत असंही धंगेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com