Kolhapur Shiv sena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Political Crime : पोलिसानेच रचला शिवसेना शहाध्यक्षाच्या खुनाचा प्लॅन; पन्नास लाखांचे जप्ती प्रकरण

Rahul Gadkar

kolhapur,15 October : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गडहिंग्लज शहराध्यक्षाला पोलिसांकडून लुटण्याचा प्लॅन समोर आला आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी या प्रकरणात मध्यस्थी करत असलेल्या व्यक्तीला चोप दिला.

पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी जप्त केलेल्या ५० लाखांच्या प्रकरणात साक्षीदार असलेले शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख संतोष चिकोडे यांचा खंडणीसाठी खून करण्याची सुपारी दिल्याचा बनाव उघडकीस आला आहे. एका पोलिस कर्मचाऱ्यासह स्थानिक मध्यस्थानेच हा बनाव केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा तक्रार अर्ज पोलिसांत दिल्याचे चिकोडे यांनी दिला आहे.

मागील आठवड्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी पुणे आणि पन्हाळा येथील रहिवाशांनी 50 लाख रुपयांची रक्कम आणली होती. खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर 50 लाखांची रोकड पोलिसांनी (Police) जप्त केली होती. या प्रकरणात साक्षीदार होण्यासाठी पोलिसांनी चिकोडे यांना विनंती केली.

दुसऱ्याच दिवशी उपशहरप्रमुख संदीप कुराडे यांना स्थानिक मध्यस्थाचा फोन आला. पन्नास लाखांच्या जप्ती प्रकरणात चिकोडे यांचा खून करण्यासाठी कर्नाटकातील गुंडांना सुपारी दिली असून, पैसे देऊन हे प्रकरण मिटवा, असा सल्ला त्याने कुराडेंना दिला.

त्यामुळे आम्ही अधिक चौकशी केली असता माझ्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे कुराडे यांनी माहिती दिली. अधिक माहितीसाठी त्याला बोलवून घेतले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी संतप्त शिवसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.

या सर्व प्रकारानंतर या घटनेमागे येथील पोलिस ठाण्यातीलच एक कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे. त्याने स्थानिक व्यक्तीला हाताशी धरून हा बनाव रचत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचारी व स्थानिक मध्यस्थाच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. दोन दिवसांत संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नाही, तर पोलिस अधीक्षकांकडे दाद मागणार असल्याचे कुराडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT