Hasan mushrif : हसन मुश्रीफांच्या सुरक्षेत कसूर; पोलिस व्हॅनविना सहकाऱ्याच्या गाडीतून पोचले कार्यक्रमाला

Hasan Mushrif's security Issue : तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा चौक येथील मेळावा संपल्यानंतर सुरक्षा कवच भेदून महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती.
Hasan mushrif
Hasan mushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 14 October : एकीकडे वाय दर्जाची सुरक्षा भेदून माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली असताना कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुरक्षेतही हलगर्जीपणा दिसून आला. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा चौक येथील मेळावा संपल्यानंतर सुरक्षा कवच भेदून महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती.

त्यानंतर आज पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या सुरक्षितेत कसूर झाल्याचे निदर्शनास आले. पोलिस गाडी आणि चालक न आल्याने मुश्रीफ हे आपले सहकारी शिवाजी पाटील यांच्या गाडीतून कार्यक्रमास पोहोचले. त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या दोन्हीही गाड्या मागेपुढे नसतानाही मुश्रीफ आल्याने सर्वजण आवाक झाले.

कोल्हापूरमधील (Kolhapur) केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन आज सकाळी सातच्या सुमारास होते. शाहू महाराज या कार्यक्रमाला अगदी वेळेवर पोहोचणार होते, त्यामुळे उशीर होऊ नये; म्हणून हसन मुश्रीफ यांनी पोलिसांचा ताफा किंवा चालक यांची वाट न बघता सहकाऱ्याच्या गाडीतून कार्यक्रमास्थळी दाखल झाले.

हसन मुश्रीफ कोणताही ताफा किंवा पोलिस बंदोबस्त न घेता कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, ही गोष्ट हसन मुश्रीफ यांनी सावरून घेतली.

शाहू महाराजांना आज सकाळी वंदे भारत ट्रेनने लवकर पुण्याला जायचं होते. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी लवकर आयोजित केला होता. सकाळी साडेसहा किंवा पावणे सातला हा कार्यक्रम करायचा होता. एवढ्या लवकर तयार होऊन येणं शक्य झालं नाही.

मला तर वेळेवर यायला पाहिजे. शेवटी आचारसंहितेनंतर तरी हे गाड्या बंदोबस्त कुठे राहणार आहे. आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, अशी मिश्किल टिपण्णी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ आल्यानंतर तीस मिनिटांनी पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी आला. मात्र, मुश्रीफ हे कार्यक्रम स्थळी अनपेक्षितपणे पोचल्यामुळे अनेकांना धक्का बसला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com