Sharad Pawar addressing media in Kolhapur, sharing views on PM Modi’s 75th birthday and clarifying retirement discussions linked to Mohan Bhagwat’s statement. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : 'पंतप्रधान मोदींना थांबा म्हणण्याचा नैतिक अधिकार मला नाही, कारण...'; शरद पवारांनी केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

Sharad Pawar on Modi Retirement : देशाचे पंतप्रधान मोदी यांचा बुधवारी (ता.17) 75 वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा केला गेला. देशासह परदेशातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे पंचाहत्तरीनंतर पंतप्रधान मोदी राजकीय निवृत्ती घेणार का? याबाबतची चर्चा रंगल्या होत्या.

Jagdish Patil

Kolhapur News, 18 Sep : देशाचे पंतप्रधान मोदी यांचा बुधवारी (ता.17) 75 वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा केला गेला. देशासह परदेशातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तर दुसरीकडे पंचाहत्तरीनंतर पंतप्रधान मोदी राजकीय निवृत्ती घेणार का? याबाबतची चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य कारणीभूत ठरलं.

मात्र, त्यावर भागवत यांनी स्पष्टीकरण देत ते वक्तव्य मोदींच्या निवृत्ती संदर्भात नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोदींच्या निवृत्ती संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी नरेंद्र मोदींना मी पंचाहत्तरीनंतर थांबा, असं म्हणू शकत नाही, तो मला नैतिक अधिकार नाही.

कारण मी स्वत: पंचाहत्तरीनंतर थांबलो नाही, आता माझं वय 85 आहे, असं म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. यावेळी शरद पवारांनी आपण नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, 'राजकारणात अशा प्रसंगी कटुता ठेवू नये. यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानुसार आम्ही वागणारी माणसं आहोत.

माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, त्यामुळे आम्हीही आणत नाही.' शिवाय मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असं म्हणू शकत नाही आणि ज्यांनी त्या संदर्भात वक्तव्य केलं होतं. ते आता आम्ही तसं बोललोच नसल्याचा खुलासा करत आहेत, असं म्हणत पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर मिश्कील प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT