सोलापूर : बार्शी येथील विशाल फटे (Vishal phate) याच्या भगवंत सहकारी पतसंस्थेतील दोन्ही लॉकर्स शनिवार (ता. २९ जानेवारी) उघडण्यात आले. मात्र, पोलिसांना (Police) त्या दोन्ही लॉकरमध्ये दमडीही सापडली नाही. दोन्ही लॉकर रिकामेच असल्याची बाब समोर आली. लॅाकर्समध्ये काहीच नसल्याचे मी आधिपासूनच सांगत होते, असे विशाल फटे (Vishal phate Scam) म्हणाला.
शुक्रवारी लॅाकर्सची चावी नसल्याने त्या उघडता आल्या नव्हत्या. त्यानंतर शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित लॅाकर्सच्या साई सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. चावी नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञांमार्फत लॅाकर्स उघडले. त्यामध्ये पोलिसांनाचा काहीच मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांचा भ्रमनिरास झाला. लॅाकर्स संबंधी पोलिसांनी फटेकडे चौकशी केली असता तो म्हणाला मी तुम्हाला आधिपासूनच सांगत होते, त्यामध्ये काहीच नाही म्हणून, त्यामुळे आता गुणंतवणूक दारांच्या पैशाचे फटेने काय केले, असा सवाल पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
विशाल फटेला आपल्या विरोधात तक्रार दाखल होऊ शकतात, असा पुढचा धोका लक्षात आला असावा. त्यामुळे त्यांने नोव्हेंबर २०२१ मध्येच लॅाकर्समध्ये ठेवलेली रक्काम किंवा अन्य ऐवज तेथून काढून घेतली असावी, अशी शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.
विशाल फटे हा आधीही लॅाकर्समध्ये काही नाही, असे म्हणत होता. मात्र, त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तपासाचा भाग म्हणून दोन्ही लॅाकर्स तपासले. लॅाकरमध्ये काही मिळून आले नाही, आता पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस उपअधीक्षक संजयकुमार बोठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, त्याच्या भगवंत पतसंस्थेतील दोन्ही लॉकरमध्ये काहीतरी महत्त्वाची कागदपत्रे सापडतील, थोडीफार रक्कम असेल, असे पोलिसांना वाटत होते. साई सेक्युरिटी सर्व्हिसेसच्या तंत्रज्ञाला घेऊन पोलिसांनी पंच व फटेच्या समक्ष ते लॉकर उघडले. मात्र, त्यात काहीच सापडले नाही, दोन्ही लॉकर रिकामेच होते. त्यामुळे आता तक्रारदारांचे 29 कोटी रुपये त्याने नेमके कुठे गुंतवले, यादृष्टीने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जादा पैसे मिळतील, असे अमिष दाखवून विशाल फटे याने सुरवातीला लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. लोकांचा विश्वास संपादन करून त्याने कोट्यवधी रुपये मिळविले आणि स्वत:साठी महागडी चारचाकी, दोन बंगले बांधले. एका व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आणि गरज असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला द्यायचे, असेच व्यवहार अधिक फटेने अधिक केल्याचेही समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.