कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने सहा नगरपालिका आणि नगरपंचायतीत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे.
कागल आणि मुरगुडमध्ये राष्ट्रवादी (एसपी) आणि शिवसेना महायुती मुश्रीफ यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
शाहू ग्रुपचे समरजीत सिंह घाटगे आणि माजी खासदार संजय मंडलिक गट एकत्र येण्याची शक्यता राजकीय समीकरण बदलू शकते.
Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीतील अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला काही दिवस शिल्लक असताना अद्याप कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय प्रमुख गटातील कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसात आघाडी, युती संदर्भात एकमत करून अर्ज भरण्याचे धांदल उडणार आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिका, नगरपंचायतमध्ये भाजपने स्वतंत्र निवडणुकीचा नारा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने चंदगडमध्ये दुसऱ्या राष्ट्रवादीला सोबत घेतले आहे. तर मुरगुड आणि कागलमध्ये जवळपास स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत मंत्री मुश्रीफ यांच्या गटाच्या विरोधात आघाडी आणि महायुतीतील दोन तुल्यबळ गट एकत्र येण्याची तयारी करत आहेत. सध्या ही चर्चा सकारात्मक असून लवकरच या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात रान उठवणारे हे पक्ष आणि गट या निवडणुकीत मात्र गळ्यात गळे घालताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना एकटे पाडण्याची खेळी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीतील शिवसेनेकडून खेळली जात आहे.
कागल आणि मुरगुड नगरपालिकेमध्ये शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीत सिंह घाटगे आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचा गट एकत्र येण्याची शक्यता आहे. घाटगे आणि मंडलिक यांच्यात युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती समरजीत घाटगे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली आहे.
दरम्यान गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये भाजप जनसुराज्य शक्ती आणि जनता दल एकत्र आल्याने शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे गडहिंग्लज वासियांचं लक्ष लागून राहिला आहे. तर मुरगुड मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे कार्यकर्ते प्रवीण सिंह पाटील हे भाजपमध्ये गेल्याने भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे मंत्री मुश्रीफ यांच्याकडे गेल्याने या ठिकाणी महायुतीतील घटक पक्षातच मोठा संघर्ष आहे.
FAQs :
1. कोल्हापूरमध्ये भाजपनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय का घेतला?
→ स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी भाजपनं हा निर्णय घेतला.
2. राष्ट्रवादी-शिवसेनेची कोणती खेळी चर्चेत आहे?
→ कागल आणि मुरगुडमध्ये हसन मुश्रीफ यांना एकटे पाडण्याची रणनीती चर्चेत आहे.
3. कोणते दोन गट एकत्र येण्याची शक्यता आहे?
→ शाहू ग्रुपचे राजेश घाटगे आणि संजय मंडलिक यांचा गट.
4. या समीकरणाचा मुश्रीफ यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो?
→ स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांची पकड कमकुवत होऊ शकते आणि स्पर्धा तीव्र होईल.
5. चंदगडमध्ये कोणती युती झाली आहे?
→ दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येत चंदगडमध्ये युती केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.