Hasan mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापूरमध्ये राजकारण तापलं; मंत्री मुश्रीफांची थेट रक्तपात करण्याची भाषा

Hasan mushrif News : कोल्हापूर जिल्ह्यातील सुळकुडच्या पाणी योजनेवरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील सुळकुडच्या पाणी योजनेवरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. कागल आणि इचलकरंजी मतदारसंघातील लोकप्रतिनिधींची ईर्षा यानिमित्ताने टोकाला पोहचली आहे. मंत्री मुश्रीफ व कागलचे घाटगे या प्रश्नावरून एकत्र येऊन सुळकुडच्या पाणी योजनेला विरोध करत असल्याचे दिसते. या पाणी योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक नियोजित आहे.

त्या पार्श्वभूमीवरच आमदार प्रकाश आवाडे यांनी दोन दिवसांपूर्वी इचलकरंजीत बैठक घेत विरोध करणाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्याला आज कोल्हापुरातील सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या बैठकीत मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिले. सुळकुड मधून पाणी दिले जाणार नाही. इचलकरंजीला मजलेची पाणी द्यावे, हे मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ, अन्यथा रक्तपात होईल, अशी भाषाच थेट मंत्री मुश्रीफ यांनी उच्चारली.

इचलकरंजी शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत दूधगंगा नदीतून सुळकुड गावाजवळून पाणी नेण्याची योजना मंजूर झाली. कागलमधील लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर इचलकरंजी विरुद्ध कागल असा वाद पेटताना दिसत आहे. आज दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत इचलकरंजीला सुळकुड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.

सुळकुड पाणी योजना रद्द न झाल्यास रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. दूधगंगेतून इचलकरंजीला पाणी देण्याऐवजी मजरेवाडीतून त्यांना पाणी देण्यासाठी निधी मंजूर झाला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत पर्याय सुचवावेत, असा सल्ला मुश्रीफांनी दिला.

या बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, के.पी.पाटील, उल्हास पाटील प्रवीण सिंह पाटील, यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT