CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama

CM Eknath Shinde News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi : गिरीश महाजन, खासदार नवनीत राणा, अभिनेत्री कंगणा राणौत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी केला.

Maharashtra Political News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अजित पवारांच्या सत्तेतील एन्ट्रीने मजबूत झाले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा समोर येत असल्या तरी या तिघांचे टार्गेट हे महाविकास आघाडी आणि त्यांचे नेते असल्याचे दिसून आले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री राहिलेल्या आणि आता मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्या काळात भाजपच्या नेत्यांना खोट्या आरोपांमध्ये गोवण्याचा कसा प्रयत्न झाला, फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्लान कसा ठरवला गेला? याबद्दल काही गौप्यस्फोट केले आहेत. ठाणे येथे माध्यमांशी बोलतांना शिंदे यांनी अनेक गोष्टीचा उलगडा केला.

भाजपचे आमदार गिरीश महाजन, खासदार नवनीत राणा, चित्रपट अभिनेत्री कंगणा राणौत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. एवढेच नाही तर तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खोटे आरोप ठेवून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

CM Eknath Shinde
Ajit Pawar Baramati Sabha : मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार बारामतीत पुन्हा बोलले; "२००४ अन् २०१९ ला संधी होती, पण..."

मला काही गोष्टी माहीत आहेत, सत्तेचा दुरूपयोग कोण करत होतं आणि आरोप कोण कोणावर करताय हे जनतेला माहीत आहे. आम्ही योग्यवेळी विरोधकांना उत्तर देऊ, असेही शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनीही केला होता.

आता राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या त्या आरोपाला दुजोरा दिला आहे. ठाण्यात माध्यमांशी बोलतांना महाविकास आघाडी सरकारने कसे भाजपच्या नेत्यांना खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न केला, हे सांगितले.

शिंदे म्हणाले, रश्मी शुक्ला प्रकरणात सीबीआयाने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीसांचा संगणक हॅक झाला होता. त्यांनी कोणताही रिपोर्ट लीक केला नाही. फडणवीसांना क्लिनचिट देण्यात आली आहे. मग विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप खोटे होते का? असा प्रश्न शिंदे यांना विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतांना खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न झालेल्या भाजप नेते, आमदार, खासदार नेत्यांची नावेच सांगतली.

CM Eknath Shinde
Chhagan Bhujbal News : सरकारमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावावर ५४ आमदारांच्या सह्या, सगळेच अजितदादांसोबत; भुजबळांचा मोठा दावा

गिरीश महाजन, नवनीत राणा, कंगना राणौत, नारायण राणे यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सत्तेचा आणि यंत्रणांचा दुरूपयोग महाविकास आघाडीचं सरकार असताना झाला. देवेंद्र फडणवीस यांनाही गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. पण, सीबीआयाने `दुध का दुध`, `पाणी का पाणी`, केले आहे, असेही शिंदे म्हणाले.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com