Prajakt Tanpure Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLA Teach Student : आमदार बनले शिक्षक! विद्यार्थ्यांना शिकवले अन् अधिकाऱ्यांनाही दिले महत्वाचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Tanpure Teach Students In Parner : ग्रामीण भागातील शाळांकडे सरकारचे पुरेसे लक्ष नसल्याच्या तक्रारी वारंवार होतात. वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थ्यांना दळणवळणाची गैरसोय, एसटीची महामंडळाचे ढिसाळ व्यवस्थापन, रस्त्यांची दुरावस्था, संगणक-ऑनलाइन शिक्षणाची असुविधा, पडक्या इमारती अशी अवस्था ग्रामीण शिक्षणाची आहे. मात्र यात स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग मिळाला तर या शाळांची स्थिती आणि शिक्षणाचा स्तर सुधारता येऊ शकतो, याचीही अनेक उदारहणे आहेत. असाच अनुभव राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना आला आहे. (Latest Political News)

मुंबईहून राहुरीकडे परतत असताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सुपे (ता. पारनेर) गावाजवळील पवारवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काही शिक्षकाची भूमिकाही बजावली. यावेळी ग्रामीण भागातील मुले अत्यंत हुशार आणि चुणचुणीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

इयत्ता सातवीपर्यंतच्या या शाळेत सुमारे १०० विद्यार्थी आहेत. मात्र या सर्व वर्गांना शिकवण्यासाठी फक्त दोनच शिक्षिका आहेत. कामाचा अतिरिक्त भार असूनही त्या अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याकडे असलेली शिकवण्याची आकर्षक कला मुलांच्या व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल घडवत असल्याचे निरीक्षण आमदार तनपुरे यांनी नोंदवले.

या शाळेसाठी अजून शिक्षक उपलब्ध व्हावेत यासाठी आमदार तनपुरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या शाळेसाठी शिक्षकाची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. या शाळेच्या प्रांगणात गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून पेव्हर ब्लॉक्स बसविले आहेत. एक वर्गखोलीसुद्धा बांधली आहे. शाळा प्रशासन आणि गावाच्या योग्य समन्वयाने एक पिढी घडवली जात असल्याचे पाहून आमदार तनपुरे यांनी समाधान व्यक्त केले.

प्राजक्त तनपुरे यांनी 2019 ला पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवताना 'राहुरी-नगर -पाथर्डी' विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी भाजपचे माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांचा मोठा पराभव केला. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT