Anil Parab News : अटक टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्याची न्यायालयात धाव ; महापालिका अभियंत्याला मारहाण..

BMC News : काही शिवसैनिकांना पोलिसांना अटक केली आहे.
Anil Parab news
Anil Parab news Sarkarnama

Mumbai News : वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय बृहन्मुंबई महापालिकेनं नुकतेच पाडले होतं. त्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बृहन्मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी अभियंत्याला मारहाण केली होती.

याप्रकरणी अटक टाळण्यासाठी अनिल परब यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. परब यांच्यासह सहा जणांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या या अर्जावर उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही शिवसैनिकांना पोलिसांना अटक केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

Anil Parab news
Ashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे ; "बळीराजाला चांगले दिवस येऊ दे.."

वांद्रेतील शिवसेनेच्या ४४ वर्षे जुन्या शाखेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यालाच सोमवारी (ता. २६) अनिल परब यांनी सज्जड दम भरला. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आज ठाकरे गटातर्फे मुंबई महापालिकेच्या एच पूर्व वॉर्डावर अनधिकृत बांधकाम, कचरा, नालेसफाई तसेच पाण्याच्या समस्यांबाबत मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना परबांनी शिवसेनेच्या शाखेवरील कारवाईवरुन पालिका अधिकाऱ्यांना दम दिला.

Anil Parab news
Bihar politics : मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला ; तर्कवितर्कांना उधाण, मंत्रीमंडळ विस्तार..

"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, महाजारांची मूर्ती आत असताना शिवसेनेची शाखा तोडली जाते. शिंदे सरकारमध्ये हिंमत असेल तर संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई करावी. एवढे दिवस त्यांना अनधिकृत बांधकाम दिसले नाही. कारवाई न झाल्यास त्या अधिकाऱ्याची कॉलर धरून त्याला उद्यापासून फिरवतो. कुठ-कुठ अनधिकृत बांधकाम आहे, हे त्या अधिकाऱ्याला दाखवतो. अधिकाऱ्याने ते अनधिकृत बांधकामही तोडावे. अन्यथा आम्ही तुम्हाला तोडू," असे अनिल परब म्हणाले होते.

"सरकारला एवढी मस्ती कशाची आली आहे? बाळासाहेबांचे फोटो, शिवरायांची मूर्ती तोडली जात आहे. हे आपण आता सहन करू शकत नाही. आम्ही 15-20 दिवस वाट बघू. नंतर त्यांना कसे सरळ करायचे ते बघू. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन सरकार स्थापन झाले आहे. संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास सरकारने बाळासाहेबांचे नाव घेणे बंद करावे," अशा शब्दात अनिल परबांनी शिंदे गटाला ठणकावले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com