Prakash Abitkar, K. P. Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Abitkar : विधानसभेसाठी प्रकाश आबिटकर 'अ‍ॅक्शन मोड'वर, के.पी. पाटलांचे आरोप थोपवण्यासाठीचा प्लॅन ठरला

MLA Prakash Abitkar Vs K. P. Patil : राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील वातावरण आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलंच तापलं आहे. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के.पी. पाटील यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 1 August : राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील वातावरण आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलंच तापलं आहे. आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) आणि माजी आमदार के.पी. पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा फैरी झडू लागल्या आहेत.

बिद्री सहकारी साखर कारखान्यावर कारवाई प्रकरणी के.पी. पाटील यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना अबिटकारांच्या विरोधात निदर्शने आणि मोर्चा काढण्याचं आवाहन केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आबिटकर यांच्यावर आरोप केले आहेत.

मात्र, आता हे आरोप थोपवण्यासाठी आमदार अबिटकरांनी (Prakash Abitkar) रनणीती आखली आहे. त्यांनी आता कार्यकर्त्यांना मतदारसंघातून थेट विकासयात्राच सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठीचं पत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षात सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी आणि सार्वजनिक विकासाच्या मुद्द्यांसाठी केलेल्या प्रयत्नामुळे मतदारसंघात शेकडो कोटींची विकास कामे आली आहेत.

सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाच्या विविध विभागातून व्यक्तिगत लाभाच्या, सार्वजनिक हिताच्या अनेक योजनांचा लाभ हजारो शेतकरी, तरुण, महिला, जेष्ठ नागरिक व अपंगांसाठी मंजूर केला आहे. या सर्व योजनांची आणि विकासकामांची माहिती मतदारसंघातील लोकांना व्हावी यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून विकास यात्रेची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आबिटकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

या विकास यात्रेमध्ये राधानगरी विधानसभा (Assembly) मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांसाठी आवश्यक असणारी विविध सार्वजनिक आणि व्यक्तिगत लाभ योजनांचा शुभारंभ, लोकार्पण व जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) शुभारंभ केल्यानंतर तहसील कार्यालय भुदरगड येथे सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तिन्ही तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेत पाणंद रस्ते, जवाहर विहिरी, जनावरांचे गोठे, शाळा संरक्षण भिंती व रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यासह पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना व यशवंत घरकुल योजनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात येणाऱ्या 5 हजार घरकुलांबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे.

तर मुख्यमंत्री वयोश्री योजना, 7.50 एचपी पर्यंतच्या शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजेअंतर्गत 3 मोफत सिलेंडर अशा सर्व योजनांचा शुभारंभ या विकास यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती देखील आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT