Shivsena Politics : लोकसभेतील अपयशानंतर महायुती अॅक्शन मोडवर आहे. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत ही योजना महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (शिंद गट) 'महिला वोट बँक'वर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिवसेना (शिंदे गट) महिलांचे मेळावे घेणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याचा शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना दिल्याची दिल्याची माहिती आहे. शिवसेनेचा (शिंदे गट) पहिला महिला मेळावा सिल्लोड मध्ये होणार.त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून शिंदे गट महिला वोट बँक पक्की करणार आहे.
विधानसभेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. शिवसेना या महिला मेळाव्यांच्या माध्यमातून राज्यातील घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभा निवडणुकीत 'लाडकी बहीण' योजना गेमचेंजर ठरेल, असा विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांना आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये 100 जागा मिळण्याचा आग्रह शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या मात्र शिंदे गटाची कामगिरी चांगली राहिली. त्यामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.