Solapur, 09 November : विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी मोठा गाजावाजा करत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. काही मतदारसंघांतून उमेदवारही जाहीर केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. त्या वेळी त्यांनी मित्रपक्षाची यादी आली नसल्याचे कारण दिले. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वेगळेच कारण सांगितले असून श्रीमंत मराठ्यांसाठी हा निर्णय झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) हे सोलापुरात आले होते. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर आंबेडकर यांनी सोलापुरात पहिली सभा घेतली आहे. सोलापुरातील वंचितच्या उमेदवारांसाठी त्यांची आज सायंकाळी सभा होणार आहे. त्या वेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून घेतलेल्या माघारीमागचे कारण सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांना उभं केलं. मात्र, काही दिवसांतच अर्ज माघारी घायला लावले. त्या माघारीतून राज्यातील 200 श्रीमंत मराठा कसे निवडून येतील, याचे नियोजन झाले आहे. त्या नियोजनात दुर्दैवाने मनोज जरांगे पाटील सहभागी झाले होते, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
विधानसभेची ही निवडणूक आरक्षणाची आहे, त्यामध्ये पहिलं आरक्षण हे Obc आरक्षण आहे. उद्याच्या विधानसभेच्यानंतर 200 मराठा आमदार निवडून जातील, असं प्रेडिक्ट केल जातं आहेत, त्यामुळे obc मध्ये भीती वाढत आहे, असा दावाही त्यांनी केला.
आंबेडकर म्हणाले, मराठवाड्यातील लढती ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरच होणार आहेत, असा दावाही आंबेडकरांनी केला. मराठ्यांनी मराठा समाजाला मतदान करायचं आणि obc हा आरक्षणवाद्यांना मतदान करायचं, अशी परिस्थिती आहे.
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी व्हायला शिवसेना जबाबदार आहे. मी मुंबईकर आहे. ज्याला कोणाला चॅलेंज करायचं असेल त्यांनी ते खुशाल करावं. मुंबई महापालिकेत 90 टक्के कॉन्ट्रॅक्टर हे अमराठी आहेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.