Solapur DCC Bank Scam : दिलीप सोपलांकडे सर्वाधिक 30 कोटींची जबाबदारी; कोणत्या नेत्याकडे किती रक्कम पाहा...
Solapur, 09 November : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांना अडचणीत आणणारी घटना घडली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांसह माजी संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सुमारे 238 कोटी 44 लाख रुपये नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Solapur DCC Bank) गैरव्यवहार प्रकरणात सर्वाधिक रक्कम ही माजी मंत्री, बार्शीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान उमेदवार दिलीप सोपल यांच्याकडे तब्बल 30 कोटींची जबाबदारी आहे. बार्शीतील बॅंकेचे माजी संचालक अरुण कापसे यांच्यावर 20 कोटींच्या नुकसानीची जबाबदारी असणार आहे.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरवहारप्रकरणी सहकार विभाग आणि रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर नेमण्यात आलेल्या समितीच्या चौकशीत या गैरव्यवहाराची सत्यता आढळून आली होती. त्यानंतरही जबाबदारी निश्चित होत नसल्याने राऊतांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणाला जबाबदार धरून मोहिते पाटील, शिंदे बंधू, राजन पाटील या मातब्बर नेत्यांसह 35 जणांवर सुमारे 238 कोटी 44 लाख रुपये नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या नेत्याचा, संचालकाचा, अधिकाऱ्याचा आणि कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांवर नुकसानीची जबाबदार देण्यात आलेली आहे.
चौकशी अधिकारी किशोर तोष्णीवाल यांनी आपला अहवाल विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे सादर केला आहे. त्या अहवालानुसार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal), आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील या दिग्गज नेत्यांवर जिल्हा बॅंकेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित केली आहे.
वसुलीसाठी कोणते नेते, माजी संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात आलेली रक्कम : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील : तीन कोटी ५ लाख ५४ हजार, माजी मंत्री दिलीप सोपल : ३० कोटी २७ लाख २८ हजार, माजी मंत्री (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे वारसदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील ३ कोटी १४ लाख ६५ हजार, आमदार बबनराव शिंदे : ३ कोटी ४९ लाख २३ हजार, आमदार संजय शिंदे : ९ कोटी ८४ लाख ४४ हजार, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील : ५५ लाख ५४ हजार, माजी आमदार राजन पाटील : ३ कोटी ३४ लाख २१ हजार.
माजी आमदार दिलीप माने : ११ कोटी ६३ लाख ३४ हजार, माजी आमदार दीपक साळुंखे : २० कोटी ७२ लाख ५१ हजार, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील : १६ कोटी ९९ लाख ८० हजार, माजी आमदार जयवंतराव जगताप : ७ कोटी ३० लाख २ हजार, १६ कोटी ९९ लाख ८० हजार, माजी आमदार (कै.) चांगोजीराव देशमुख यांचे वारसदार पांडुरंग देशमुख : १ कोटी ५१ लाख २१ हजार, माजी आमदार (कै.) एस. एम. पाटील यांचे वारसदार सुरेश पाटील व अनिल पाटील : ८ कोटी ७१ लाख ८७ हजार, माजी आमदार (कै.) सुधाकरपंत परिचारक यांचे वारसदार प्रभाकर परिचारक : ११ कोटी ८३ लाख ६ हजार.
शेकाप नेते चंद्रकांत देशमुख : ८ कोटी ४१ लाख २९ हजार, (कै.) रामचंद्र वाघमोडे यांचे वारसदार प्रकाश वाघमोडे व संजय वाघमोडे : १ कोटी ४८ लाख ६७ हजार, सुरेश हसापुरे : ८ कोटी ३ लाख ७ हजार, बबनराव आवताडे : ११ कोटी ४४ लाख ८१ हजार, राजशेखर शिवदारे : १ कोटी ४८ लाख ६७ हजार, अरुण कापसे : २० कोटी ७४ लाख ७८ हजार, (कै.) संजय कांबळे यांचे वारस जयश्री कांबळे व संतोष कांबळे : ८ कोटी ४१ लाख २९ हजार, भैरु वाघमारे : ४ कोटी ४१ लाख २९ हजार, सुनील सातपुते : ८ कोटी ४१ लाख २९ हजार, रामदास हक्के : ८ कोटी ४१ लाख २९ हजार.
(कै.) चांगदेव अभिवंत यांचे वारसदार कमल अभिवंत, सुधाकर अभिवंत, सुनील अभिवंत : १ कोटी ५१ लाख २१ हजार, भरतरीनाथ अभंग : १ कोटी ५१ लाख २१ हजार, विद्या बाबर : १ कोटी ५१ लाख २१ हजार, सुनंदा बाबर : १० कोटी ८४ लाख ७२ हजार, रश्मी बागल : ४३ लाख २६ हजार, नलिनी चंदेले : ८८ लाख ५८ हजार, सुरेखा ताटे : १ कोटी ५१ लाख २१ हजार, सुनीता बागल : १ कोटी ५१ लाख २१ हजार, किसन मोटे : पाच लाख, के. आर. पाटील : पाच लाख, सीए संजीव कोठाडिया : ९१ लाख १२ हजार रुपये.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.