Sangli News : सांगली दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला सल्ला दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे. हे न पाहता मुस्लिम म्हणून मतदान करण्यास सांगितले आहे. यासाठी मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी याबाबत मुस्लिम नागरिकांमध्ये जागृती करावी, असेदेखील आंबेडकर म्हणाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मंगळवारी सत्तासंपादन सभेनिमित्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी त्यांनी मिरजेतील मिरासाहेब दर्गास भेटी दिली. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे यांच्यासह मुस्लिम समाजासोबत अनेक घडामोडींवर चर्चा केली. त्यामुळे ‘वंचित’कडून मिरजच्या जागेबाबत मोर्चेबांधणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिल्यानंतर मिरज विधानसभेच्या या जागेवर वंचित बहुजन आघाडी दावा करण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या दौऱ्यादरम्यान, मिरजेत त्यांनी मुस्लिम समाजातील धर्मगुरू व नागरिकांची बैठक घेतली. त्यावेळी आंबेडकर म्हणाले, ‘‘देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास हिटलरशाही सुरू होईल. हिटलरने "ज्यू" लोकांसमवेत जे केले, ते आरएसएस तुमच्या सोबत करेल. त्यांच्या नजरेत सर्व लोक गुलाम आहेत. हे सर्व रोखण्यासाठी मुस्लिम समाजाने पक्षनिहाय मतदान न करता भाजपविरोधात निवडून येण्यास सक्षम असलेल्या उमेदवाराला मतदान करावे; मग तो कोणत्याही पक्षाचा असो," असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे. या वेळी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, नजीर झारी, मेहबूब मणेर आदी उपस्थित होते.
ईव्हीएमच्या मुद्द्यांवर आंबेडकर म्हणाले, " ईव्हीएमचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. ईव्हीएममध्ये उमेदवारांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. ४३० हून अधिक उमेदवार ईव्हीएममध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत. उमेदवारांची संख्या त्याहून अधिक वाढल्यास बॅलेट पेपरशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे ईव्हीएमच हटविण्यासाठी जनमत तयार करावे लागेल," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.