hasan mushrif prakash awade sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Awade : आमदार प्रकाश आवाडे हसन मुश्रीफांवर भडकले; म्हणाले, कागल म्हणजे...

Prakash Awade On Assembly Election 2024 : भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे, असंही आणदार आवाडे यांनी म्हटलं.

Akshay Sabale

कागल तालुक्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन रुग्णालये मंजूर करून आणली आहेत. आमचा नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव असताना त्याकडे लक्ष दिले नाही. तुमचा मतदारसंघ म्हणजे जिल्हा नव्हे, अशा शब्दांत आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ठणकावलं आहे.

"पालकमंत्री तिकडे होते. कोविडमध्ये आम्ही त्रास भोगला. आता सगळे एकत्र असूनही उपयोग होत नाही. यापुढे हे चालणार नाही. आता पालकमंत्री आणि आम्ही हे सुरूच होणार आहे," असा इशाराही प्रकाश आवाडे यांनी मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांना दिला आहे.

घारपडे नाट्यगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) बोलत होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, इचलकरंजी मतदारसंघातून उमेदवार आणि विविध विषयांवर आवाडे यांनी भाष्य केलं.

प्रकाश आवाडे म्हणाले, "तुमच्या मतदारसंघातील तालुके म्हणजे जिल्हा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून सर्वत्र पळतात. त्याप्रमाणे आमचे इचलकरंजी शहर कारखानदार, कामगार दिवस रात्र पळतात, कष्ट करतात. त्यामुळे आमचं गाव पळते."

"इचलकरंजी कागलपेक्षा मोठे शहर आहे. येथे महापालिका आणि 300 बेडचे रूग्णालय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नर्सिंग कॉलेज मंजूर केले. तरीही तुम्ही नियोजन केले नाही. तसेच प्रत्येक विकासकामांत महापालिकेचे आयुक्त आडवे येत आहेत. त्यांना कसे व कोठून येथे आणले, ते प्रत्येक चांगल्या कामाला आडवे येत आहेत. त्यामुळे नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यावरही पालकमंत्र्यांनी कारवाई केली नाही," अशी नाराजी आमदार आवाडे यांनी व्यक्त केली.

यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना उद्देशून प्रकाश आवाडे म्हणाले, "तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सांगितलं की, 'ज्यांना प्रवेश दिला नाही, त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही.' आम्ही म्हणतो, आम्ही प्रवेश केला नाही. मी पाच वर्षे भाजपसोबत राहिलो. पण, मी आता लढणार नाही, राहुल लढणार आहे, असं भाजप नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याबाबत भाजप नेते निर्णय घेणार आहेत."

"भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. पक्षानं हाळवणकर, हिंदुराव शेळके यांना उमेदवारी दिल्यास दु:ख नाही. शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र माने जोरदार तयारी करत आहेत. विठ्ठल चोपडे यांनीही तयारी करावी. महायुती जो निर्णय घेईल, तो घेईल," असं म्हणत आमदार आवाडे यांनी महायुतीनं उमेदवार दिल्यास राहुल आवाडे यांना अपक्ष उतरवणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT