Yashwant Mane-Praniti Shinde-Rajan Pail Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा राजन पाटलांवर गंभीर आरोप; ‘अप्पर तहसील कार्यालय दम देऊन अनगरला नेलंय’

Angar Upper Tehsil Office : महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संग्राम मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना प्रणिती शिंदे यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावर सरकारच्या विशेषतः राजन पाटील यांच्याविरोधात भूमिका मांडली.

विश्वभूषण लिमये

Solapur, 01 October : मोहोळ तालुक्याचे अप्पर तहसील कार्यालय दम देऊन अनगरला घेऊन गेले आहेत. आम्हाला अप्पर तहसील कार्यालय मोहोळमध्येच हवे आहे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून माजी आमदार राजन पाटील यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संग्राम मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना प्रणिती शिंदे यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावर सरकारच्या विशेषतः राजन पाटील यांच्याविरोधात भूमिका मांडली.

अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून (Angar Upper Tehsil Office)मोहोळचे राजकारण चांगलेच पेटले होते. आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने रान उठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही धारदार शब्दांत आजी आणि माजी आमदारांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या बाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागात कुरुल, कामती आणि बेगमपूर अशी मोठ्या बाजारपेठांची गावे आहेत.

कुरुल, कामती आणि बेगमपूर या परिसरातील गावांना मोहोळ तहसील कार्यालय खूप दूर आणि अडचणीचे ठरते. दक्षिण मोहोळ तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी मोहोळच्या दक्षिण भागातील मध्यवर्ती असणाऱ्या बेगमपूर अथवा कुरुल या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती, असेही प्रणिती यांनी पत्रात म्हटले होते.

महाविकास आघाडीच्या वतीने आज सोलापूरमध्ये काढण्यात आलेल्या संग्राम मोर्चात प्रणिती शिंदे यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालरून नाव न घेता राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्यावर टीका करताना ते कार्यालयात दम देऊन अनगरला नेले आहे, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना तुषार सिंचन (स्प्रिंकलर) आणि ठिबक सिंचन (ड्रीप इरिगेशन) अनुदान गेल्या दीड वर्षापासून मिळाले नाही. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नावर काही देणं घेणं नाही, अशी टीकाही प्रणिती शिंदे यांनी केली.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT