Sanjay Raut : 'अमित शहांना 'फक्त निवडणुका' एवढंच काम'; राऊतांनी भाजपला सरदार वल्लभभाईंची करून दिली आठवण

MP Sanjay Raut criticizes BJP leader Amit Shah visit to Mumbai : भाजप नेते अमित शाह यांच्या मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची टीका.
Sanjay Raut 2
Sanjay Raut 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना 'कूचकामी', अशी टीका करत, भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

अमित शाह मुंबई दौऱ्यावर असल्यानं महायुती भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अमित शाह यांना देशाचे गृहमंत्री असल्याची आठवण करून देत, सरदार वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्री म्हणून कसं काम केलं, याचा इतिहास वाचण्याचा सल्ला दिला. संजय राऊत म्हणाले, "अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री म्हणून संविधानानं काही नियम आणि विषय ठरवून दिले आहेत. अमित शाह फक्त निवडणुका, भाजपचा प्रचार, लाडक्या उद्योगपतींना मदत आणि विरोधकांवर हल्ले करणे, एवढंच काम करतात". पण गृहमंत्र्यांचे एवढंच काम नाही, याची आठवण करून देतो, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut 2
Devendra Fadnavis: लोकसभेत वोट जिहाद, देवेंद्र फडणवीस यांचा रोष कोणावर ?

'भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा इतिहास वाचावा, गृहमंत्री म्हणून त्यांनी किंवा इतर नेत्यांनी केलेले काम काय होतं, ते तपासावं. कधीही व्यक्तिगत सूडाचं राजकारण त्यांनी केलं नाही. गृहमंत्रायलाचा वापर या देशात याआगोदर कुणी असा केल्याचे आठवण नाहीत, दिसला नाही. पण अमित शाह नेमकं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत', असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut 2
Siddaramaiah : सिध्दरामय्या यांचा पत्नीबाबत मोठा दावा; म्हणाले, तो निर्णय आश्चर्यचकित करणारा!

फडणवीसह भाजप नेते 'कूचकामी'

भाजपवर हल्ला चढवताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रात वाढलेले दौरे म्हणजे, त्यांचे महाराष्ट्रातील स्थानिक नेते कूचकामी ठरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते 'कूचकामी' आहेत. सत्तेत बसवलेली लोक कूचकामी आहेत. या दौऱ्यांचा तसाच अर्थ निघतो. पराभव दिसू लागला आहे. त्यातून त्यांची धडपड सुरू आहे, असे म्हटले.

राजधानी महाराष्ट्रात आणतील

'महायुतीविरोधात रोष आहे. लोकांचे मत निर्माण झालेलं आहे. त्यामुळे भाजप कधीही काहीही करेल. महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत तरी देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवतील, असा टोला लगावून देशाची राजधानी दिल्ली आहे, त्याचे दप्तर इथं आणतील, हलवतील', असेही संजय राऊत यांनी म्हंटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com