Ram Satpute-Praniti Shinde
Ram Satpute-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Exit Poll Lok Sabha Election 2024 : सोलापुरात भाजपच्या हॅट्‌ट्रीकचे स्वप्न भंगणार; प्रणिती शिंदे आघाडीवर, सातपुते पिछाडीवर

Vijaykumar Dudhale

Mumbai, 01 june : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे ह्या आघाडीवर असल्याचा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलनुसार वर्तविण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते हे पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये भाजपचे हॅटट्रीकचे स्वप्न भंग पावणार असण्याची शक्यता या एक्झिट पोलनुसार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), तर भाजपकडून आमदार राम सातपुते (Ram Satpute) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही युवा आमदारांमध्ये जोरदार फाईट बघायला मिळाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निकाल आला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात हॅटट्रीकचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे दिसून येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध वृतसंस्थांचे मतदानानंतरचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सोलापूरमध्ये या वेळी काँग्रेस आघाडीवर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यानंतरही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आमदार प्रणिती शिंदे ह्या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे भाजप आणि महायुतीला तो मोठा धक्का असण्याची शक्यता आहे. अर्थात हे एक्झिट पोलचा अंदाज आहे. प्रत्यक्षात निकाल हे ४ जूनला लागणार आहेत, त्यात काय निकाल येतो, याकडे सोलापूरकरांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT