Exit Poll Lok Sabha Election 2024 : माढ्यात मोहिते पाटील आघाडीवर; भाजपचे निंबाळकर पिछाडीवर

Lok Sabha Election 2024 : माढ्यात भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छूक होते. मात्र, भाजपे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले होते. मोहिते पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत माढ्यातून निवडणूक लढवली होती.
Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil
Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai, 01 June : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत. माढ्यातील निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, माढ्यात भाजपला धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे मतदानानंतरचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढ्यात भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छूक होते. मात्र, भाजपे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले होते. मोहिते पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत माढ्यातून निवडणूक लढवली होती.

मोहिते पाटील यांच्या खेळीमुळे माढ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यात सर्वाधिक चर्चेतील माढ्यात मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट एक्झिट पोलनुसार वर्तविण्यात आला आहे.

Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil
Exit Poll Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का; सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर, प्रतिभा धानोरकर आघाडीवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sachin Kalyanshetti-Dhairyasheel Mohite Patil
sachin kalyanshetti-ranjitsinh mohite patil
MLC election exit poll
eknath shinde