Ajit Pawar-Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Ajit Pawar-Praniti Shinde-Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘शिंदेंनी उजनीहून पाईपालाईन आणली अन्‌ सोलापूरकर पुढील २०० वर्षे तेच पाणी पिणार आहेत’

विश्वभूषण लिमये

सोलापूर : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाण्यासंदर्भात अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेला आज (ता. ४ जून) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी उत्तर दिले. अजितदादा काय म्हणाले हे मला माहिती नाही. मात्र, सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी (Solapur) काय केले, हे सर्व सोलापूरकरांना माहिती आहे. सोलापूरसाठी शिंदे यांनी उजनी धरणाहून (Ujani Dam) पाईपलाईन आणली आणि त्याद्वारेच आगामी दोनशे वर्षे सोलापूरकर पाणी पिणार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. (Praniti Shinde responds to Ajit Pawar's criticism on Sushilkumar Shinde)

सोलापूर जिल्ह्यात एकाचवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद दिले होते. तरीही सोलापूरची आजची पाण्याची परिस्थिती काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही त्यांना मत द्यायला आलो नव्हतो. तुम्ही लोकांनीच त्यांना निवडून दिले होते, असे सांगून पाणीप्रश्न न सुटल्याबद्दल शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यावर प्रणिती शिंदे यांनी आज भाष्य केले.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होण्यासाठी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. उजनी धरणाहून दुसरी पाईपालाईन आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या दुहेरी पाईपलाईनसाठी भाजपने एक वीटही रचलेली नाही. ज्यावेळी सोलापूरसाठी पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता, त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी तो आपल्याला उजनी धरणातून मिळवून दिला.

उजनी धरणावरून पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर केलेल्या टीकासंदर्भात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, माझा कोणताही गैरसमज झालेला नव्हता. मी फक्त एवढेच म्हणाले की, जे आमच्या हक्काचे पाणी आहे, ते आम्ही कोठेही वळवू देणार नाही. तसे झाले तर रान पेटवू. मी सोलापूरची लोकप्रतिनिधी आहे. त्या पाण्यावर आमचा अधिकार आहे. दुसरा कोणी हक्क सांगत असेल तर हे कोणालाच पटणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT