Kolhapur Political News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाकडून 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर बुधवारी त्याचे फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात आले.
तत्पूर्वी रात्रभर केलेल्या चौकशीत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांपुढे नरमला आहे. इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. तर मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली कोरटकर याने पोलिसांना दिली. इतकंच नव्हे तर जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपण मंचरियाल येथून चेन्नईला जाणार असल्याची माहिती कोरटकर यांनी पोलिसांना दिली.
25 फेब्रुवारी रोजी इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी सावंत यांनी कोरटकर यांच्यावर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. मात्र समाज माध्यमातून कोरटकर यांनी हा आपला आवाज नसून हा मॉर्फ केलेला आवाज आहे, असा दावा करत आरोपाचे खंडन केले होते.
तसेच तपासासाठी मोबाईल दिल्यानंतर त्यातील डाटा डिलीट केल्याचेही उघड झाले होते. या संपूर्ण प्रकारानंतर फरार असलेल्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक करत न्यायालयाकडून 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी घेतली होती. बुधवारी दिवसभर फॉरेन्सिक टीमच्या दोन अधिकाऱ्यांकडून कोरटकर यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले होते. तत्पूर्वी बुधवारी पहाटेपर्यंत कोल्हापूर पोलिसांकडून कोरडकर ची कसून चौकशी सुरू होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात कोरटकरने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. शिवाय फॉरेन्सिक टीम कडून आणखी चौघांच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यात आले आहेत. काल झालेल्या तपासात जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्याकडून चौकशी सुरू होती. दरम्यान फरार काळात कोरटकर हा कुठे कुठे गेला? त्याला कोणाकोणाचे सहकार्य मिळाले? याबाबतचा तपास पोलिसांकडून आता होणार आहे.
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर हा पुन्हा एकदा फरार झाला होता. तो तेलंगणा राज्यातील मंचरियाल रेल्वे स्टेशन या परिसरातून त्याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. तत्पूर्वी तो हैदराबाद मार्गे चेन्नईला फरार होणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. करार असल्यापासून त्याने मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर केला नव्हता. शिवाय ऑनलाईन व्यवहार देखील करणे त्याने टाळले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.