Prashant Koratkar : कोरटकर ज्या लॉकअपमध्ये तेथील सीसीटीव्ही आम्हाला द्या, तक्रारदारांची मागणी

prashant koratkar CCTV Footage : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या निवेदनानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील कोरटकर संदर्भात असलेला गुन्हा नोंदीमुळे तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे.
Prashant Koratkar On Indrajeet Sawant
Prashant Koratkar On Indrajeet SawantSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर आणि जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. चौकशीसाठी कोरटकरची कोठडी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात असणार आहे. मात्र सध्या त्याला राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यावर आता तक्रारदाराने देखील कस्टडीतील माहिती समोर येण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामुळे कोरटकरच्या राहणीमानावर सुद्धा तक्रारदारांचा वॉच राहणार आहे.

कोरटकरला ज्या ठिकाणी कस्टडीत ठेवण्यात येणार आहे. तेथील तीन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाच्या कामकाजाकरता आम्हाला हवी आहे, अशी मागणीच आता तक्रारदार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले असून या मागणीमुळे कोरटकर यांच्या अडचणीत आणखीन निर्माण होणार आहे.

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या निवेदनानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील कोरटकर संदर्भात असलेला गुन्हा नोंदीमुळे तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील संपूर्ण कार्यालय आणि आवारामधील सीसीटीव्ही कोणत्या भागात बसवलेले आहेत व ते चालू आहेत का? याबाबत तपशील न्यायालयीन कामाकरता व माहितीकरता आवश्यक आहे. तो मिळावा अशी विनंती एका परिपत्रकाद्वारे इंद्रजीत सावंत यांनी केली आहे.

Prashant Koratkar On Indrajeet Sawant
Prashant Koratkar : धक्कादायक! शिवद्रोही कोरटकरच्या संपर्कात पोलिस अधिकारी? महेश कोंडावार अडचणीत येण्याची शक्यता

तर दुसऱ्या निवेदनामध्ये, प्रशांत कोरटकर याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर आरोपीला ज्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्या कोठडी बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तीन दिवसाचे संपूर्ण फुटेज मला न्यायालयीन कामकाजासाठी व माहिती करता आवश्यक आहे ते आम्हाला मिळावेत, असा विनंती अर्ज तक्रारदार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

दरम्यान न्यायालयाकडून कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर पोलीस पुढील तपास करणार आहेत. फोनवरून धमकी दिल्यानंतर कोरटकरने हा आवाज आपला नसल्याचा दावा केला होता. मात्र पोलीस तपासात इंद्रजीत सावंत यांना कोरटकर यांच्याच मोबाईलवरने फोन झाल्याची माहिती समोर आली होती.

Prashant Koratkar On Indrajeet Sawant
Prashant Koratkar: चप्पल फेकली,चिल्लरही उधळली, अटकेनंतर कोर्टाचा कोरटकरला पहिला झटका; 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

त्यामुळे आज कोरटकर याच्या आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅब कडून घेतले जाणार आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून त्याचा पुढील तपास सुरू आहे. जागेअभावी कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्याच ठिकाणी त्याचा मुक्काम आहे. त्यामुळे या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com