Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या धमकी प्रकरणानंतर अंतरिम जामीन मिळवून फरार झालेल्या कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दणका दिला. मुदत संपलेल्या अंतरिम जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळल्यानंतर कोरटकर पुन्हा एकदा फरार झाला आहे.
दिवसेंदिवस कोरटकर याच्या अडचणीत वाढ होत असताना शिवप्रेमींच्या आणखी एका मागणीमुळे कोरटकर यांच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत. शिवप्रेमींकडून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर यांनी पुरावा नष्ट केल्याचा दाखला देत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि फोनवरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नागपूरमधील डॉ. प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, या आरोपाचे खंडन करत तो आवाज आपला नव्हेच, आवाजामध्ये मॉर्फ केला असल्याचे स्पष्टीकरण कोरटकर यांनी दिले होते. पोलिसांकडून अटक वॉरंट निघाल्यानंतर कोरटकर हा पसार झाला आहे. मात्र, तपास कामी त्यांनी आपला मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट करून पोलिसांच्या स्वाधीन केला असल्याचे निष्पन्न झाले.
जुना राजवाडा पोलिसांकडून (Police) डेटा डिलीट केला असल्याबाबतची माहिती न्यायालयात देण्यात आली. फॉरेन्सिक लॅबकडे कोरटकर यांच्या आवाजाच्या सॅम्पलसाठी देण्यात आलेला फोनमध्ये सर्व डाटा डिलीट असल्याचं उघड झाल्याने पुरावा नष्ट केल्यासंदर्भातील गुन्हा कोरटकर यांच्यावर नोंद करावा, अशी मागणी शिवप्रेमी यांच्याकडून करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकर याचा अंतरिम जामीन फेटाळला आहे. मात्र, अटकेपूर्वीच पुन्हा कोरटकर फरार झाला आहे.
कोरटकर यांच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस नागपूरला रवाना
न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अटकेसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील एक पथक बुधवारी नागपूरला रवाना झाले आहे. सध्या कोरटकर फरार आहे. कोल्हापूर पोलिसांकडून शोध मोहीम जारी असून नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) मदतीने त्याच्या मार्गावर पथके रवाना झाली आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.