Disha Salian Murder Case : दिशा सालियन हत्याप्रकरणी वडील कोर्टात; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Aaditya Thackeray News Mumbai High Court : दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या तिच्या वडिलांनी गंभीर आरोप करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Disha Salian, Aaditya Thackeray
Disha Salian, Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिशा सालियन हत्या प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर आता तिच्या वडिलांनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेत वडिलांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दिशावर सामुहिक बलात्कार करून तिच्या हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप सतिश सालियान यांनी याचिकेत केला आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोर्या आणि सूरज पांचोली यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.या याचिकेनंतर आज विधानसभेतही सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी उचलून धरण्यात आली. त्यावर आदित्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Disha Salian, Aaditya Thackeray
Nitesh Rane : राणेंचे मंत्रिपद काढून घ्या, आमदारकी रद्द करा! राज्यपालांकडे याचिका दाखल होणार...

आदित्य ठाकरे म्हणाले, मागील पाच वर्षापासून मला त्रास देण्याचे सतत चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. पाच वर्षे बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात उत्तर देऊ, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर ठाकरेंची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेऊन आल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही सरकारला एक्स्पोज केले आहे. औरंगजेबप्रकरणी संघानेही एक्स्पोज केले आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, हा आमचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची परिस्थिती सर्वच क्षेत्रात बिकट होत चालली आहे. ते निवडणूक जिंकले ते निवडणूक आयोगामुळे. त्यांच्या जाहीरनाम्यातील एकही मुद्दा अर्थसंकल्पात आले नाहीत. माझ्यामुळे सभागृह बंद पाडायचे. त्यांनी महाराष्ट्राबद्दल बोलावे, असेही ठाकरे म्हणाले.

Disha Salian, Aaditya Thackeray
Shivraj Patil Chakurkar : काँग्रेसच्या देव्हाऱ्यातील 'देव' मोदींच्या भेटीला, शिवराज पाटील चाकूरकरांनी घेतली पंतप्रधानांची सहकुटुंब भेट!

आदित्य ठाकरेंना अटक करा

विधानसभेत आज आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला त्यांनी यावेळी दिला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही ही मागणी उचलून धरली. भाजपच्या सदस्यांनी एसआयटी चौकशीचा अहवाल कधी समोर येणार, आरोपींची चौकशी होणार का, असा सवाल केला. त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी लवकरात लवकर एसआयटी चौकशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com