Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Assembly Election : प्रशांत परिचारक वाढविणार भाजपचे टेन्शन; विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटले...

हुकूम मुलाणी

Mangalvedha News : विधानसभा निवडणुकीला जेमतेम नऊ महिन्यांचा अवधी शिल्लक असताना माजी आमदार प्रशांत परिचारक निवडणूक लढवण्याचे संकेत देत जनतेच्या दरबारात उतरले आहेत, त्यामुळे प्रशांत परिचारकांचा इशारा भाजपनेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. (Prashant Paricharak hints at contesting assembly elections)

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे समाधान आवताडे यांना भाजपमधून आमदार होण्याची संधी मिळाली. आमदार समाधान आवताडे यांनी सत्तेचा लाभ घेत मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला. आता विधानसभा निवडणुकीला जेमतेम नऊ महिन्यांचा अवधी शिल्लक असताना प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिल्यामुळे मंगळेवढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नव्या वर्षातील पांडुरंग परिवाराच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन परिचारक यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, रामकृष्ण नागणे, युन्नुस शेख, औदुंबर वाडदेकर, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, गौरीशंकर बुरुकुल, गौडाप्पा बिराजदार, भारत बेदरे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनदर्शिका प्रकाशनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रश्न अजूनही रखडले आहेत. मालक तुम्ही या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर सोमवारी वेळ द्या, अशी मागणी केली. त्यावर सोमवारच काय, या मतदारसंघातील प्रश्नासाठी कायमच उपलब्ध राहणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागावे, असे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक हे विधानसभा उमेदवारीचे दावेदार असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आहे, त्यामुळे आगामी काळातील राजकीय हालचाली परिचारक यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

मंगळवेढा तालुक्यामध्ये परिचारक गटाचा विस्तार कमी होता; परंतु दामाजी कारखान्याचे नेतृत्व शिवानंद पाटील यांची सत्ता आल्यामुळे तालुक्यात गटविस्तार करण्यास संधी मिळाली. त्यामुळे 2014 व 2019 ला झालेल्या निसटत्या पराभवातील मताधिक्य हे मंगळवेढ्यातून दामाजी कारखान्याच्या सत्तेमुळे भरून निघू शकते, असा राजकीय अंदाज असल्यामुळे परिचारकांनी आपले राजकीय पत्ते खोलण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळू लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT