Nashik Politics : लोकसभा निकालावर विधान परिषद इच्छुकांची रणनीती; दराडेबंधूंना महायुतीचे कडवे आव्हान

Legislative Council Election : नाशिकच्या दराडेबंधूंसह 21 आमदारांचा कालावधी संपुष्टात येणार आहे
 Legislative Council Election
Legislative Council ElectionSarkarnama

अरविंद जाधव

Nashik News : आगामी वर्षभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होते ना होते, तोच विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागणार आहे. या निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा मोठा प्रभाव राहणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतो, यावरच इच्छुकांची गणिते अवलंबून असणार आहेत. यात नाशिकमधील शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन जागांचाही समावेश असणार आहे. (Political calculations of Legislative Council aspirants will depend on result of Lok Sabha)

आगामी 2024 हे वर्ष निवडणुकांचे असणार आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. या निकालाचा मोठा परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार आहे, त्या निकालाच्या आधारावर विधानसभेसाठी डावपेच आखले जातील. मात्र, यात सर्वसामान्य मतदारांशी थेट संबंधित नसलेल्या विधान परिषदेच्या 21 जागांसाठी होणारी लढतही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Legislative Council Election
Drivers Strike : चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केंद्र सरकारशी चर्चा

विधान परिषदेच्या आमदारांचा कालावधी सहा वर्षांसाठी असतो. सध्याच्या विधान परिषदेत कार्यरत असलेल्या आमदारांपैकी तब्बल 21 आमदार 31 मे ते 27 जुलै 2024 या कालावधीत निवृत्त होतील. यात येवल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांचा समावेश आहे. दराडेबंधूंव्यतिरिक्त अनिकेत तटकरे, बाबाजानी दुर्राणी, डॉ. प्रज्ञा सातव, डॉ. मनीषा कायंदे, उबाठा गटाचे नेते अनिल परब, निरंजन डावखरे, सुरेश धस आदींचा समावेश आहे.

नाशिकचे दराडेबंधू उबाठा शिवसेनेशी आपली नाळ कायम ठेवून आहेत. निवृत्त होणाऱ्या आमदारांमध्ये सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे. मात्र, तूर्तास या आमदारांचे लक्ष लोकसभेच्या निवडणुका आणि त्याच्या निकालाकडे असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली, त्यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. आता दराडेबंधूंना मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपचेही थेट आव्हान असणार आहे, त्यामुळे या निवडणुकासुद्धा तेवढ्याच चुरशीच्या होतील, यात शंका नाही.

 Legislative Council Election
Solapur Politics : पवारांच्या गटातील नेत्याने घेतली अजितदादांची भेट; माजी आमदारही गळाला?

दरम्यान, 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या सदस्यांनंतर थेट 2026 आणि 2028 मध्येच नूतन आमदार विधान परिषदेमध्ये दाखल होतील. त्यामुळे विधान परिषदेमध्ये आमदारांची तुल्यबळ संख्या कायम ठेवणे अथवा वाढवणे यासाठी 2024 हे वर्ष तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By-Vijay Dudhale

 Legislative Council Election
Madha Loksabha : तुमचं मिटत नसेल तर मी माढ्यातून लढतो; जगतापांची मोहिते-पाटलांना गुगली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com