Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

लबाड लांडग ढाॅंग करतय.. : उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर जहरी टीका

सातारा विकास आघाडीच्या Satara Vikas Aghadi माध्यमातून पंतप्रधान आवास योजना Pradhanmantri awas yojana घरकुल योजनेंतर्गत किमान मुलभुत सुविधांसह With basic amenities हक्काचे घर उपलब्ध करुन दिले. कोणतीही झोपडी हटवण्यास आम्ही कारणीभूत ठरलो नाही.

Umesh Bambare-Patil

सातारा : झोपडपट्टीतील हातावर पोटं असणा-यांच्या जीवावर उठणा-यांच्या तोंडी, कायापालटाची भाषा करणाऱ्याचे हे प्रेम खरं नसून हा ढोंगीपणा व मगरीचे अश्रू आहेत. त्यांचे हे नवीन ढोंग माजगांवकर माळावरीलच काय साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टी भागातील नागरीकांनी ओळखले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटातील गाण्याप्रमाणे लबाड लांडग ढाँग करतंय... आता स्वाँग करतंय.. इतकेच त्याला महत्व आहे, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उदयनराजेंनी म्हटले की, सातारा शहरातील माजगांवकर माळ, लक्ष्मी टेकडी, भिमाबाई आंबेडकरनगर, ४४० सदरबझार, रामाचा गोट, राजलक्ष्मी पिछाडी, अशा सर्व ठिकाणी हातावरची पोटं असणारी आणि कष्टकरी जनता राहते. आज ज्यांनी काही ढोंग केले आहे, त्यांचेच सर्वेसर्वा असणारे तत्कालिन सत्ताधीशांनी माजगांवकर माळावरील झोपडया उठवून येथील लोकांना हाकलवून लावण्याचा ठराव पालिकेत पारित केला होता.

बुलडोझर आणि मशिनरी आणुन येथील लोकांना देशोधडीला लावावचे पूर्ण नियोजन केले होते. केवळ आम्ही ठामपणे आडवे पडल्यानेच येथील झोपड्या शाबुत राहिल्या. त्याकाळात पोलिस लाईनच्या पाठीमागील पंताचा गोट काही भागातील झोपडयांची वस्ती पालिस बंदोबस्तात आणि बळाचा वापर करून, पालिकेमार्फत हटवली होती. येथील लोकांना काही क्षणांत बेघर केले गेले. त्यावेळी यांचेच सर्वेसर्वा तत्कालीन नगरपरिषदेत सर्व शक्तीमान सत्ताधीश होते.

झोपडपट्टीसदृप्य वसाहती सर्वसामान्य माणसेच राहतात, त्यांच्याविषयी माणुसकीची भूमिका घेऊन माजगांवकर माळासह भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, २७८ रामाचा गोट आदी ठिकाणी आम्ही सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना घरकुल योजनेंतर्गत किमान मुलभुत सुविधांसह हक्काचे घर उपलब्ध करुन दिले. कोणतीही झोपडी हटवण्यास आम्ही कारणीभूत ठरलो नाही.

तसेच जेथे त्यांनी ढोंग केले त्या माजगांवकर माळ येथे पीएमआय योजनेअंतर्गत शाहुपूरी पोलिस स्टेशन ते आकाशवाणी झोपडपट्टी अखेर रस्ता डांबरीकरणाकरीता सुमारे ७५ लाख आणि आकाशवाणी ते महानुभव पंथाचा मठ अखेर रस्त्यासाठी सुमारे रुपये ७५ लाखांच्या डांबरीकरण कामाकरीता पालिकेच्या जनरल कौन्सिल ठराव क्रमांक ४२ दिनांक ०३/०९/२०२१ चे ठरावान्वये मंजूरी देण्यात आली आहे.

याकामांमध्ये करंजे इंन्डस्ट्रीयल इस्टेटच्या अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचाही समावेश आहे. ठराव मंजूरीनंतरचे प्रशासकीय सोपस्कार देखील होतील. पावसाळ्यानंतर याकामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी कायापालट कशाला म्हणतात हे आधी समजुन घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या तथाकथित ढोंगी कार्याकडे एक कुतुहल म्हणून बघण्यापलिकडे त्याला फारशी किंमत वाटत नाही.

यांची श्रेयाचे साँग आणि इतर ढोंगं मागे पाहिली आहेत. यापुढेही पहायला मिळतील. त्यामुळे मराठी चित्रपटातील गाण्याप्रमाणे लबाड लांडगं ढाँग करतंय.. आता स्वाँग करतंय, इतकंच त्याला महत्व आहे. माजगांवकर माळसह सर्व झोपडपट्टीधारक तर संबंधीतांचे पुतना मावशीचे प्रेम निश्चितच ओळखतील, असेही उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT