सातारा : महाराष्ट्रातील आजची राजकिय परिस्थितीबाबत आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. कारण गेल्या दोन वर्षांपासून ही खदखद सुरू होती. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र ठेवणे ही तारेवरची कसरत होते. पण, ही लोक फार काळ एकत्र राहात नाही. यातूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. (Udayanraje Bhosale News in Marathi)
महाराष्ट्रातील अस्थिर परिस्थितीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीतून भाष्य केले आहे. खासदार उदयनराजे म्हणाले, महाराष्ट्रात आजची जी राजकिय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात अश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. मोठा धक्का बसला वगैरे असे काहीही नाही. कारण, गेली दोन वर्षापासून ही खदखद चालू होती. ज्यावेळी एका ध्येयाने विचाराने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात, त्यावेळी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कोणत्याही अमिषांची गरज पडत नाही. (Maharashtra Political Crisis News)
मात्र, केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र येतात, त्यावेळी त्यांचे उद्दीष्ट सत्ता स्थापन करणे हाच असतो. या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, अमिष दाखवावे लागते. ही लोक फारकाळ एकत्र राहात नाहीत. यातूनच महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मी आता यातील तज्ञ व त्यांचे पक्षश्रेष्टी यावर मी भाष्य करणार नाही.
ज्या विचाराने हे लोक एकत्र आले त्यातून हे टिकणार तर किती दिवस यावर लोक बोलून दाखवत होती. पक्षश्रेष्टी वेळ देत नाहीत, कामे होत नाहीत. आमदारकी, खासदाकीचा जसा कालावधी असतो तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महा पालिका, नगरपंचायतींचा ही असतो. आता हा कालावधी संपला आहे.
त्यामुळे सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. बारकाईने विचार केला तर शिवसेना व भाजप यांच्या आमदारकी व खासदारकीच्या मतदारसंघात एक तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस विरोधक राहिले आहेत. त्यामुळे त्यांची समीकरणे जुळणार नव्हती. पण, ती जुळवली गेली होती. त्यांना एकत्र ठेवता आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.