Ajit Pawar, Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khatav News : मुख्यमंत्र्यांना अकार्यक्षम म्हणाले, अन॒ त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले...पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Prithviraj Chavan काँग्रेस कार्यकर्त्यांच्या योध्दा प्रशिक्षण शिबीरासाठी पृथ्वीराज चव्हाण वडुज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

-आय्याज मुल्ला

Khatav Congress News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तर हजार कोटी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. तर अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी उल्लेख केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता हा राजकारणातील किती दांभिकपणा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तर सत्तेसाठी मोदी कोणत्या थराला जावू शकतात हे राज्यातील जनतेने पाहीले असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस Congress कार्यकर्त्यांच्या योध्दा प्रशिक्षण शिबीरासाठी पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan वडुज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख RanjitSinh Deshmukh, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राजेंद्र शेलार, खटाव तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, बाबासाहेब माने आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपबरोबर सत्तेत जाण्याच्या भूमिकेबद्दल बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, राज्याच्या राजकारणात काल चुकीची घटना घडली. ज्यांचे हात बरबटलेले होते त्यांना चौकशीची भिती दाखविली गेली. श्री. पवार यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राज्याच्या अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांकडे निलंबनाची तक्रार दिली आहे.

त्यावर न्यायिक कारवाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी दोन तृतीयांश म्हणजे 36 आमदार श्री. पवार यांच्याकडे असतील तर पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटतील. अन्यथा निलंबीत होतील अशी कायद्याची परिस्थिती आहे. हा राष्ट्रवादीमधील विषय आहे. आता रस्त्यावरील लढाई सुरू झाली आहे.

त्याचे रणसिंगदेखील शरद पवार साहेबांनी कऱ्हाडमधून फुंकले आहे. संपूर्ण राज्यभर दौरा करून नव्याने पक्ष उभारणीचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात 17 पक्षांची आघाडी झाली आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी हा देखील महत्वाचा पक्ष आहे. राष्ट्रवादीत विभाजन झाले असले तरी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष हा आमच्या 17 पक्षांच्या आघाडीतील घटक पक्ष राहणार आहे.

भाजप, शिंदे गट व अजित पवार यांच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारबद्दल बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांना समर्थन देणाऱ्या 14 ते 15 आमदारांच्या निलंबनाबाबत विधीमंडळ अध्यक्षांकडे कारवाई सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे 18 ऑगस्टच्या आत म्हणजे सुप्रिम कोर्टाने ही सर्व बाब अध्यक्षांकडे सोपविल्यानंतर 90 दिवसांच्या आत त्यांना अंतिम निर्णय द्यावा लागेल.

तो निर्णय शिंदे यांच्यासह त्यांच्या 14 - 15 सहकाऱ्यांना निलंबीत करण्याशिवाय दुसरा काही होऊ शकत नाही.कायद्याची परिस्थिती स्पष्ट आहे. घटनेच्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर झाल्याने त्यांचे निलंबन अटळ आहे. त्यामुळे शिंदे सुध्दा निलंबीत होतील. त्यावेळी मुख्यमंत्रीपद रिक्त होईल. त्यावेळी त्याठिकाणी कोण बसणार आहे. चर्चा अशी ऐकू येते की, अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्री करणे आरएसएस, भाजपच्या नेत्यांना मान्य आहे की नाही ते आपणाला माहिती नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे विरोधाभास असणारे तीन चाकांचे हे सरकार आहे. श्री. चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदींना सत्ता टिकविण्याशिवाय लोकांचे भलेबुरे, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी,मणीपूरमधील हिंसाचार या बाबी दिसत नाहीत.

महिला कुस्तीपटूंवर भाजपच्या एका खासदाराने अत्याचार केला तरी मोदी त्यांच्याबद्दल चकार शब्द बोलले नाहीत. सत्तेचा वापर प्रचंड संपत्तीसाठी केला जात आहे. मोठ मोठी कॉन्ट्रॅक्ट अदानीला मिळतात, अदानी हा दहा वीस टक्क्यांचा मॅनेजर असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT