Karad News : अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर...पृथ्वीराज चव्हाण

Sharad Pawar आज खासदार शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर कराडच्या प्रीतिसंगमावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांची गर्दी उसळली आहे.
Prithviraj Chavan, Ajit Pawar
Prithviraj Chavan, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Prithviraj Chavan News : अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करतील आणि पुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री करतील अशी माझी माहिती आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केली.

अजित पवार Ajit Pawar यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांसह सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकिय चर्चांना उधाण आले. त्यामुळे राष्ट्रवादी NCP फुटल्याने दादांसोबत कोण आणि साहेबांसोबत कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. आज खासदार शरद पवार कराडच्या दौऱ्यावर असून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करणार आहेत.

Prithviraj Chavan, Ajit Pawar
Satara NCP News : कालपर्यंत अजित दादांसोबत असलेले मकरंद पाटील आज पवारसाहेबांच्या गाडीत...

त्यापार्श्वभूमीवर कराडच्या प्रीतिसंगमावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांची गर्दी उसळली आहे. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करतील आणि पुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री करतील, अशी माझी माहिती आहे.

Prithviraj Chavan, Ajit Pawar
Satara NCP Political News : सातारा राष्ट्रवादीत उभी फूट! अजितदादांच्या बंडाला रामराजे,मकरंद पाटलांची साथ तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com